राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना धुळीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:38 AM2021-02-11T04:38:35+5:302021-02-11T04:38:35+5:30

चामोर्शी : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे माेठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना हाेत आहे. त्यामुळे रस्ता कामाच्या ...

Dust trouble to citizens due to work on national highways | राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना धुळीचा त्रास

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना धुळीचा त्रास

Next

चामोर्शी : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे माेठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना हाेत आहे. त्यामुळे रस्ता कामाच्या स्थळी दरराेज पाणी मारावे, अशी मागणी शहरातील दुकानदार व नागरिकांनी आ. डाॅ. देवराव हाेळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चामोर्शी शहरातून सुरू असलेल्या कामामुळे माेठ्या प्रमाणात धूळ निर्माण हाेत आहे. येथून आवागमन करणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडत असून त्याचा त्रास नागरिकांना हाेत आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दरराेज पाणी मारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदन देताना चामोर्शी येथील दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश गोयल, उपाध्यक्ष संजय बोमनवार, कोषाध्यक्ष डॉ. अंचित विस्वास, सचिव रमेश अधिकारी, सहसचिव जिग्नेश जैन, रामभाऊ बोमनवार, राजेंद्र भांडेकर, संजीव विस्वास, विशाल चिलके, सोज्ज्वळ आलुरवार, उमेश चिलके, प्रशांत पालारपवार, नंदू शील, राहुल पिपरे यांनी केली.

Web Title: Dust trouble to citizens due to work on national highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.