ॲपवर मिळेल ई-चलानची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:12+5:302021-09-27T04:40:12+5:30

वेगमर्यादेचे उल्लंघन, विना हेल्मेट दुचाकीस्वार, सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे, नो पार्किंग नियमाचे उल्लंघन आदी कारणास्तव वाहनचालकांना पाचशे रुपयांपासून ते दहा ...

E-challan information will be available on the app | ॲपवर मिळेल ई-चलानची माहिती

ॲपवर मिळेल ई-चलानची माहिती

Next

वेगमर्यादेचे उल्लंघन, विना हेल्मेट दुचाकीस्वार, सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे, नो पार्किंग नियमाचे उल्लंघन आदी कारणास्तव वाहनचालकांना पाचशे रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. पूर्वी वाहतूक, महामार्ग पोलीस वाहनांची धरपकड करून दंड वसूल करत. आता ई- चलानद्वारे दंड करण्यात येत आहे. प्रत्येक वाहतूक पोलिसांना डिव्हाइस दिले आहे. त्यात ऑनलाइन ई-चलानसह पावती देऊन दंड वसूल करण्याची सोय आहे. दरम्यान, अनेकदा कळत नकळत सिग्नल तुटतो तर कधीकधी वेगमर्यादेचेही उल्लंघन होते. अनेक वाहनचालक दुसऱ्यांदा पोलिसांनी वाहन पकडल्याशिवाय दंड भरत नाहीत. दंड भरण्यासाठी स्वत:हून पुढे येणाऱ्यांची संख्या अल्प असल्याचे वाहतूक शाखेच्या सूत्रांनी सांगितले.

बाॅक्स

ॲपवर कशी बघाल माहिती

महाराष्ट्र पाेलीस विभागाने महाट्रॅफिक हे ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल स्टाेअरवर उपलब्ध आहे. या ॲपवर वाहनाचा क्रमांक व वाहन चेसीस क्रमांक टाकल्यास किती चलन आहेत, याची माहिती मिळते.

- ई-चलान ऑनलाईन पद्धतीनेही भरण्याची सुविधा आहे.

Web Title: E-challan information will be available on the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.