आइसगोळा, पाणीपुरी खाताय..? जरा जपून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 04:15 PM2024-05-07T16:15:54+5:302024-05-07T16:17:32+5:30

Gadchiroli : बर्फ शुद्ध असेलच याची शाश्वती अजिबात नाही

Eating ice balls, panipuri..? Be careful | आइसगोळा, पाणीपुरी खाताय..? जरा जपून

Eating ice balls, panipuri..? Be careful

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी :
उन्हाळा आला की शीतपेय विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत कुणालाच शंका येत नाही. उन्हाची काहिली शमविण्यासाठी बर्फाचा गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान- मोठ्यांची गर्दी पाहायला मिळते, परंतु बर्फगोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे.

काही बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून तयार करण्यात येतो. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी आहे. पाणीपुरीदेखील कुठेही मिळते. पण त्यातील पाणी, ते पदार्थ देणारे यांची स्वच्छता तेवढीच महत्त्वाची असते. अनेकदा डॉक्टर असे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत, असा सल्ला देतात. रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोळा व आइस कॅन्डी तयार केली जाते. निम्न दर्जाचा रंग आणि सॅकरीनचा विक्रेते उपयोग करतात. बर्फगोळे ठेल्यावर नेहमीच अस्वच्छता असते. त्यातच गोळा तयार करताना बर्फ लोखंडाच्या ब्लेडमधून किसला जातो. या ठेल्यावर बऱ्याचदा रासायनिक रंगांच्या बाटल्या उघड्यावर ठेवलेल्या असतात. अशुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फ आजाराला आमंत्रण देणारा आहे. त्यामुळे पोटाचे विकार, कावीळ, डायरिया आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. या आजारांचे प्रमाण उन्हाळ्यात अशुद्ध बर्फाचे सेवन केल्यामुळे वाढते. लग्नात बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. रस्त्यावर बर्फमिश्रित रस आणि अन्य पदार्थ खाऊ नयेत


पाणीपुरीतून गॅस्ट्रोचा धोका
• पाणीपुरीमध्ये पाण्याचे महत्त्व जास्त असून, अस्वच्छ, घाण पाणी असेल तर ते पोटात जाऊन इन्फेक्शन होऊन व्यक्ती आजारी पडू शकते. त्यामुळे अस्वच्छ ठिकाणी असलेल्या गाड्यांवरील पाणीपुरी खाऊ नये. 
• पाणीपुरी देणारी व्यक्ती तासनतास हातगाड्यांवर उभी राहते. उन्हातान्हात असल्याने प्रचंड घाम येतो.
• स्वच्छ पाण्याने हात धुतातच असे नाही, त्याच हाताने पाणीपुरी देतात. त्यामुळे आजार होऊ शकतो.

साफसफाई असलेल्या ठिकाणीच खाद्य खावे. स्वच्छ पाणी प्यावे. गॅस्ट्रोचा फार त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. मयुरी गोंगले, आरमोरी
 

Web Title: Eating ice balls, panipuri..? Be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.