ग्रामीण रुग्णालयातील ईसीजी मशीन बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:37 AM2021-07-28T04:37:39+5:302021-07-28T04:37:39+5:30

देसाईगंज शहरात आरोग्य सुविधा पाहिजे त्याप्रमाणात उपलब्ध नसल्याने लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या ठिकाणीच सर्वच आरोग्यविषयक कामासाठी जावे लागते. ...

ECG machine in rural hospital closed | ग्रामीण रुग्णालयातील ईसीजी मशीन बंदच

ग्रामीण रुग्णालयातील ईसीजी मशीन बंदच

Next

देसाईगंज शहरात आरोग्य सुविधा पाहिजे त्याप्रमाणात उपलब्ध नसल्याने लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या ठिकाणीच सर्वच आरोग्यविषयक कामासाठी जावे लागते. तालुक्यातील ही निकड लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकारी, आमदार यांचे शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याने ग्रामीण रुग्णालय, देसाईगंज या ठिकाणी ईसीजी, सोनोग्राफी, एक्स-रे मशीन यासारख्या सुविधा पुरविण्यात आल्या. जेणेकरून तालुक्यातील तसेच इतरही ठिकाणच्या नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा या कमी खर्चात उपलब्ध होऊन दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन उपचार करून घेणे व सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड पडू नये, हा दृष्टिकोन ठेवून या यंत्राची उपलब्धता येथील ग्रामीण रुग्णालयात करून देण्यात आली. परंतु आजमितीस सोनोग्राफी, ई.सी.जी मशीन हाताळण्यासाठी लागणारे अहर्ताधारक तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने या मशीन धूळखात पडलेल्या आहेत.

येथील सोनोग्राफी मशीन हाताळण्यासाठी खासगी सोनोग्राफी चालविणाऱ्या डाॅक्टरांना पाचारण करून आठवड्यातील एक वा दोन दिवस काहीच वेळ देऊन सोनोग्राफीचे कामे उरकली जात आहेत. ईसीजी, सोनोग्राफी, एक्स-रे मशीन हाताळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वरील यंत्रसामग्री हाताळण्यासाठी लागणारे अर्हताधारक टेक्निशियन किंवा डाॅक्टर यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: ECG machine in rural hospital closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.