रानभाजी विक्रीतून आर्थिक विकास शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:38 AM2021-08-15T04:38:11+5:302021-08-15T04:38:11+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र गडचिराेली व तालुका कृषी कार्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र गडचिराेली व तालुका कृषी कार्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी कार्यालय चामोर्शी येथे १३ ऑगस्ट रोजी आयोजित रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देवराव होळी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, कृषी अधिकारी वसंत वळवी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी नेहा फरांदे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, तालुका उमेद अभियान व्यवस्थापक विनोद बोबाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत वळवी, संचालन तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक हेमंत उंदीरवाडे तर आभार श्रीनिवास रनमले यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, शेतकरी, बचतगटाचे सदस्य उपस्थित होते.
बॉक्स
या भाज्यांचा हाेता समावेश
रानभाजी महोत्सवात २६ महिला बचतगट, २४ पुरुष बचतगट, १६ वैयक्तिक बचतगट सहभागी झाले होते. रानभाज्यांमध्ये काटवल, दिंडा, तरोटा, कुडा, आमबुशी, पातूर, शेवगा, धोपा, केना, पानाचा ओवा, कपाळफोडी, बांबू, खापरखुटी, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, अंबाडी, मटारू, पिंपळ, भुई आवळा, सुरण, कवठ, उंबर आदींचा समावेश हाेता.
130821\img_20210813_134417.jpg
रानभाजी महोत्सवाची पाहणी करताना मान्यवर फोटो