वैनगंगेची धार आटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:29 AM2019-03-17T00:29:23+5:302019-03-17T00:34:25+5:30

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे या नदीवरील पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीला गडचिरोली जिल्ह्याची जलवाहिणी म्हणून ओळखले जाते.

The edge of Wainganga took shape | वैनगंगेची धार आटली

वैनगंगेची धार आटली

Next
ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना अडचणीत : चिचडोह बॅरेज व गोसेखुर्दने अडविले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे या नदीवरील पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीला गडचिरोली जिल्ह्याची जलवाहिणी म्हणून ओळखले जाते. गोसेखुर्द धरण होण्यापूर्वी सदर नदीची धार मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत ओसंडून वाहत होती. मात्र गोसेखुर्द धरण झाल्यानंतर वैनगंगा नदीचा पाण्याचा मुख्य प्रवाहच बंद झाला. तेव्हापासून वैनगंगा नदी कोरडी पडायला लागली. त्यातच आता चामोर्शीजवळ चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले. याही बॅरेजमध्ये पाणी अडविले जात आहे. चामोर्शीच्या पुढे वैनगंगा नदी पाण्याने भरली असली तरी चामोर्शी नंतर मात्र नदी पात्र कोरडे पडत चालले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी वैनगंगा नदीवर कृषीपंप लावून शेत फुलविले होते. आता मात्र नदी आटल्याने सिंचनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणी मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी उन्हाळ्याची शेती सुध्दा करणे सोडून दिले आहे. ज्याप्रमाणे चिचडोह बॅरेजचे बांधकाम करण्यात आले, त्याच पध्दतीने चिचडोह बॅरेजपासून काही दूर अंतरावर पुन्हा एक बॅरेजची निर्मिती होणे आवश्यक आहे. अन्यथा चामोर्शी पलिकडच्या गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना उन्हाळ्यात करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The edge of Wainganga took shape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी