खाद्यतेल दहा रुपयांनी स्वस्त; आता चमचमीत खा मस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:23+5:302021-09-27T04:40:23+5:30

गडचिराेली : काेराेना काळ सुरू झाल्यापासून खाद्यतेलाच्या किमतीत भरघाेस वाढ झाली हाेती. पामतेलासह विविध तेलाचे दर वाढले हाेते. तब्बल ...

Edible oil cheaper by ten rupees; Now eat the spoonful! | खाद्यतेल दहा रुपयांनी स्वस्त; आता चमचमीत खा मस्त !

खाद्यतेल दहा रुपयांनी स्वस्त; आता चमचमीत खा मस्त !

Next

गडचिराेली : काेराेना काळ सुरू झाल्यापासून खाद्यतेलाच्या किमतीत भरघाेस वाढ झाली हाेती. पामतेलासह विविध तेलाचे दर वाढले हाेते. तब्बल दीड वर्षानंतर खाद्यतेलाचे दर १० ते १५ रुपयांनी घसरले आहेत. परंतु, बऱ्याच व्यावसायिकांनी अद्यापही फारशी घट दरात केली नाही. त्यामुळे बऱ्याच खाद्यतेलाचे जुनेच दर जिल्ह्यात कायम असल्याचे दिसून येत आहे. काही प्रमाणात दर घटल्याने गृहिणींना दिलासा मिळाला असला तरी शहराच्या विविध भागात वेगवेगळी किंमत, तर ग्रामीण भागात जुन्याच दराने तेलाची विक्री हाेत असल्याचेही वास्तव आहे.

काेट...

मागील महिन्यापासून आम्ही साेयाबीनचे तेल १५० रुपये किलाेप्रमाणे खरेदी करीत हाेताे. परवाच्या दिवशी लगतच्या दुकानातून आम्ही दाेन किलाे तेल खरेदी केले. परंतु, जुन्याच भावात दुकानदाराने आम्हाला तेल विक्री केले. त्याने जुनाच माल असल्याचे कारण सांगितले.

- सुकन्या वाघमारे, गृहिणी

...........

दर महिन्याला लागणारा किराणा आम्ही एकाचवेळी खरेदी करताे. जुना आणलेला माल अद्यापही संपलेला नाही. येत्या एक-दाेन दिवसांत जाऊन वस्तू खरेदी करणार आहाेत. परंतु, घराजवळचा एक दुकानदार खाद्यतेलाच्या किमती दहा रुपयांनी घसरल्याचे सांगत हाेता.

- वंदना रामटेके, गृहिणी

..........

म्हणून दर झाले कमी

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती काही प्रमाणात घटल्या. तसेच पामतेलाचेही दर घटल्याने खाद्यतेलाच्या दरात १० ते १५ रुपयांपर्यंत घट झाली. काही दिवसांत पुन्हा घट येऊ शकते.

विनाेेद जुवारे, व्यावसायिक

Web Title: Edible oil cheaper by ten rupees; Now eat the spoonful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.