प्रभावी अभियानाने नक्षलवादाचे कंबरडे माेडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:43 AM2021-03-01T04:43:02+5:302021-03-01T04:43:02+5:30
पाेलीस महासंचालकांच्या हस्ते २७ फेब्रुवारी राेजी देचलीपेठा व धाेडराज येथे नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पाेलीस उपमुख्यालय ...
पाेलीस महासंचालकांच्या हस्ते २७ फेब्रुवारी राेजी देचलीपेठा व धाेडराज येथे नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पाेलीस उपमुख्यालय प्राणहिता येेथे भेट देऊन नक्षलविराेधी अभियानामध्ये उत्कृष्ट काम करून वेगवर्धीत पदाेन्नती मिळविलेल्या चार पाेलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गाैरव करण्यात आला. यावेळी महासंचालकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सेवेत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. पाेलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या साेडविल्या जातील, असे आश्वासन दिले. धानाेरा तालुक्यातील सावरगाव पाेलीस मदत केंद्रालाही पाेलीस महासंचालकांनी भेट देऊन जवानांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गडचिराेली परिक्षेत्राचे पाेलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, विशेष कृती दलाचे नीलम राेहण, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, साेमय मुंडे उपस्थित हाेते.