पितृपंधरवड्यात वांगी खाताहेत भाव; ग्रामीण भागात ४० तर शहरात ६० रुपये किलाे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:43 AM2021-09-24T04:43:26+5:302021-09-24T04:43:26+5:30
काेट .... पावसाचा पुरवठ्यावर परिणाम मागील १० ते १२ दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी तुरळक तर बऱ्याच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू ...
काेट ....
पावसाचा पुरवठ्यावर परिणाम
मागील १० ते १२ दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी तुरळक तर बऱ्याच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे विविध भागातून येणारा भाजीपाल्याचा पुरवठा मंदावला. अशा स्थितीत वांग्याचे दर वधारले. इतर भाजीपाल्यावर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे त्यांचे दर स्थिरच आहेत.
- नामदेव गजभिये, व्यापारी
पावसाळ्याच्या हंगामात अनेक शेतकरी शेताच्या बांधावर भाजीपाल्याची लागवड करतात. त्यामुळे ग्रामीण भागातून माेठ्या प्रमाणावर आवक असते. गडचिराेली जिल्ह्यात शेताच्या बांधावर केवळ भेंडी, दाेडके, कारले, चवळीच्या शेंगा आदींची लागवड केली जाते. त्यामुळे या भाज्यांचा तुटवडा नाही.
- गजेंद्र कुनघाडकर, व्यापारी
काेट ....
शेतातीलच भाजीपाल्यांवर गरज भागवितात
आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच कारले, दाेडके, चवळीच्या शेंगा, गवार आदी भाजीपाल्यांची लागवड केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच आम्ही भाजीपाल्याची खरेदी करताे. याशिवाय अनेक फेरीवाले गावात येत असल्याने बाजारात जाण्याची आवश्यकता भासत नाही.
- सुनंदा भैसारे, गृहिणी
शहरी भागात नागपूर, चंद्रपूर यासारख्या शहरांमधून भाजीपाला येताे. हा भाजीपाला येथील व्यावसायिक दामदुप्पट किमतीत विक्री करतात. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातून वाॅर्डा-वाॅर्डांत भाजीपाला फिरविणाऱ्या लाेकांकडे स्वस्त भाजीपाला मिळताे.
- भावना म्हस्के, गृहिणी
पितृपक्षात धार्मिक विधी पार पडतात. यासाठी नैवेद्य म्हणून विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचा वापर करतात.
नैवेद्यात वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्याची मागणी वाढत असल्याने दरही वधारतात.