लेखी म्हणणे सादर करण्यास नगराध्यक्षांना आठ दिवसांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:39 AM2021-04-09T04:39:15+5:302021-04-09T04:39:15+5:30
गडचिरोली : येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष याेगिता पिपरे यांनी वाहनभत्त्याची अवैधरित्या उचल केल्याने त्यांना अपात्र घाेषित करावे, अशी तक्रार ...
गडचिरोली : येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष याेगिता पिपरे यांनी वाहनभत्त्याची अवैधरित्या उचल केल्याने त्यांना अपात्र घाेषित करावे, अशी तक्रार तत्कालीन बांधकाम सभापती आनंद श्रुुंगारपवार व अन्य १५ नगरसेवकांनी शासनाकडे केली हाेती. या प्रकरणाची गुरुवारी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगव्दारे सुनावणी घेण्यात आली. यात आपले म्हणणे आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश नगराध्यक्षांना देण्यात आले आहेत.
गुरूवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे सुनावणी घेण्यात आली. यामध्ये दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्यातर्फे ॲड. खानझोडे यांनी तर श्रुंगारपवार यांची बाजू ॲड. लोडल्लीवार यांनी मांडली. दोन्ही पक्षकारांच्या वकिलांचे म्हणणे शासनाने ऐकून घेतले. आठ दिवसात लेखी स्वरूपात म्हणणे सादर करावे, अशा सूचना नगराध्यक्षांना देण्यात आल्या.