आठ तालुके अजुनही पावसासाठी आसुसलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:00 AM2020-09-12T05:00:00+5:302020-09-12T05:00:07+5:30
११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १२५.६ टक्के आहे. त्या खालोखाल १४२३.९ मिमी पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत १२५४ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी आतापर्यंतच्या पर्जन्यमानाची स्थिती पाहता सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाची सरासरी गाठली जाणार की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसाची तुलना केल्यास केवळ चार तालुक्यांनी ही सरासरी गाठल्याचे दिसत असून आठ तालुके अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १२५.६ टक्के आहे. त्या खालोखाल १४२३.९ मिमी पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे. या तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे पडणाºया पावसाचे प्रमाण पाहता पडलेला पाऊस १०७ टक्के आहे.
सरासरी पडणाºया पावसाच्या तुलनेत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १३८.९ टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला आहे. प्रत्यक्षात तिथे झालेला पाऊस १३६४.९ मिमी आहे. याशिवाय मुलचेरा तालुक्यातही सरासरीच्या आसपास म्हणजे ९८.२ टक्के पाऊस झाला. या तालुक्यात प्रत्यक्षात पडलेला पाऊस १०९२.७ मिमी आहे.
सध्या धानपीक गर्भात असून पिकाला पावसाची गरज आहे. पण गेल्या १० ते १५ दिवसांपासून तुरळक प्रमाणात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. सर्वसमावेशक पाऊस न झाल्यास अनेक ठिकाणी धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या तालुक्यात पावसाची गरज
जिल्ह्यात सर्वात कमी पावसाचे प्रमाण गडचिरोली (६४.२ टक्के), देसाईगंज (६५.२), धानोरा (६६.७), कोरची (७३.८), आरमोरी (७८.८), कुरखेडा (८५.१), चामोर्शी (८६.७) आणि एटापल्ली (९०.५) या आठ तालुक्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या सुरूवातीपासून हे प्रमाण असेच कायम असल्यामुळे उरलेल्या मोजक्या दिवसात पावसाची कमतरता भरून निघण्याची शक्यता नाही.