काेराेनाच्या भितीने माेतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ज्येष्ठांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:38 AM2021-05-12T04:38:37+5:302021-05-12T04:38:37+5:30
वाढत्या वयाबराेबर डाेळ्यात माेतीबिंदू निर्माण हाेऊन दृृष्टी कमी हाेणे ही अतिशय सामान्य बाब आहे. मात्र माेतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या ...
वाढत्या वयाबराेबर डाेळ्यात माेतीबिंदू निर्माण हाेऊन दृृष्टी कमी हाेणे ही अतिशय सामान्य बाब आहे. मात्र माेतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या व्यक्तीची दृष्टी पून्हा येते. खासगी दवाखान्यात माेतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी १० ते १५ हजार रुपयांच्या जवळपास खर्च येतो. गरीब व्यक्ती एवढा खर्च करू शकत नाही. त्यामुळे केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम राबविला जाते. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात जिल्हाभरातील नागरिकांच्या माेफत शस्त्रक्रिया केल्या जातात. एवढेच नाही तर रुग्णांची ने-आण करणे व रुग्णालयात माेफत राहणे व जेवण्याची सुविधा केली जाते.
या सर्व सुविधांमुळे जिल्हाभरातील नागरिक जिल्हा नेत्र विभागातच शस्त्रक्रिया करीत हाेते. वर्षभरात जवळपास दाेन हजार नागरिकांच्या शस्त्रक्रिया केल्या जात हाेत्या. मात्र मागील वर्षीपासून काेराेनामुळे शस्त्रक्रिया करून घेण्यास नागरिक तयार हाेत नसल्याने शस्त्रक्रियांचे काम ठप्प पडले आहे.
बाॅक्स
शस्त्रक्रिया लांबल्यास अंधत्वाचा धाेका
डाेळ्यात माेतीबिंदू निर्माण हाेणे ही अतिशय सामान्य बाब आहे. मात्र माेतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर दृष्टी परत येते. माेतीबिंदू बरेच दिवस राहिल्यास ताे पिकून फुटण्याची शक्यता राहते. त्यामुळे शस्त्रक्रिया लांबणीवर टाकणे धाेक्याचे ठरू शकते.
काेट
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नेत्र विभागाची स्वतंत्र इमारत आहे. काेराेनाची साथ असली तरी नेत्र विभाग सुरूच आहे. मात्र काेराेनाच्या भीतीने नागरिक शस्त्रक्रिया करण्यासाठी येतच नाही. शासनाच्या नियमानुसार शस्त्रक्रियेपूर्वी प्रत्येक रूग्णाची काेराेना चाचणी केली जाते. त्यात निगेटिव्ह येणाऱ्याची शस्त्रक्रिया करून दिली जाते. नागरिकांनी न घाबरता शस्त्रक्रिया करून घ्याव्यात.
डाॅ. सुमीत मंथनवार
जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक, गडचिराेली
काेट
काेराेनामुळे माेतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात जाण्यास भीती वाटते. माेतीबिंदूमुळे माझी दृष्टी कमी झाली आहे. मात्र पर्याय नसल्याने राहावे लागत आहे. काेराेनाची साथ कमी झाल्यानंतर ऑपरेशन करून घेण्याचा विचार आहे.
दसरू काळबांधे, ज्येष्ठ नागरिक
काेट
माेतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी गडचिराेली येथेच जावे लागते. गडचिराेलीत काेराेना रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गडचिराेलीत पाय ठेवायलाही भीती वाटते. काेराना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर बघू.
पंढरी लाेणबले, ज्येष्ठ नागरिक
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
शासकीय रुग्णालयात काेराेनाआधी महिन्याला हाेणाऱ्या शस्त्रक्रिया-२००
मागील वर्षातील माेतीबिंदू शस्त्रक्रिया-१९५०