अहेरी तालुक्यात ४१ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:49+5:302021-01-04T04:29:49+5:30

अहेरी : अहेरी तालुक्याचा बहुतांश भाग नक्षलदृष्ट्या संवेदनशील मानला जाते. तालुक्यात २९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे. यासाठी एकूण ...

Election at 41 most sensitive polling stations in Aheri taluka | अहेरी तालुक्यात ४१ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक

अहेरी तालुक्यात ४१ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक

Next

अहेरी : अहेरी तालुक्याचा बहुतांश भाग नक्षलदृष्ट्या संवेदनशील मानला जाते. तालुक्यात २९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे. यासाठी एकूण १०४ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे ४६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील, २० मतदान केंद्रे संवेदनशील तर ४१ मतदान केंद्रे साधारण आहेत. त्यामुळे तालुक्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडणे पाेलीस विभागासमाेर आव्हान आहे. एकूण २९ ग्रामपंचायतींमध्ये २७३ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे आहे. एकूण ९९ प्रभाग असून ८३८ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. एकूण ५४ हजार ३६७ मतदार आहेत. त्यापैकी महिला मतदारांची संख्या २७ हजार १५९ व पुरूष मतदारांची संख्या २७ हजार २०६ एवढी आहे. निवडून द्यायच्या एकूण २७३ सदस्यांपैकी अनुसूचित जमातीचे १७६, अनुसूचित जातीचे ४०, मागास प्रवर्गातील १६ व सर्वसाधारण ३५ असे आरक्षण जाहीर झाले आहे. संवेदनशील मतदान केंद्रे लक्षात घेता माेठ्या प्रमाणात पाेलीस ताफ्याची गरज भासणार आहे. त्यासाठी पाेलीस विभागाने तयारी केली आहे. तसेच निवडणूक विभागासाठी ५०० मनुष्यबळाची गरज आहे. आलापल्ली व नागेपल्ली येथे ८०० पेक्षा जास्त मतदार असल्यामुळे याठिकाणी ५ सहायक मतदान केंद्रे देण्यात आली आहेत. १६ मतदान पथक राखीव ठेवली जाणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व झाेनल अधिकारी म्हणून प्रत्येकी ९ लाेकांची निवड करण्यात आली आहे.

बाॅक्स ..

प्रत्येकाची काेविड चाचणी हाेणार

काेराेनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी केली जाईल. त्यानंतरच त्यांना मतदान केंद्रावर पाठविले जाईल. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांची काेराेना चाचणी केली जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर आराेग्य कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाईल. ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली आहे.

Web Title: Election at 41 most sensitive polling stations in Aheri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.