निवडणुकीतील गंमतीजमती;  'त्या उमेदवाराने' स्वतःला मतच दिले नाही, तर कुणी जेवण पळवले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 07:36 PM2022-01-20T19:36:03+5:302022-01-20T19:51:19+5:30

गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. दोन सख्ख्या जावांमध्ये काट्याची लढत झाली. प्रतिस्पर्ध्याचे जेवण विरोधकांनी चोरले. या घटनांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले.

Election jokes; 'That candidate' did not vote for himself, but someone stole the food of the opposition. | निवडणुकीतील गंमतीजमती;  'त्या उमेदवाराने' स्वतःला मतच दिले नाही, तर कुणी जेवण पळवले..

निवडणुकीतील गंमतीजमती;  'त्या उमेदवाराने' स्वतःला मतच दिले नाही, तर कुणी जेवण पळवले..

Next
ठळक मुद्देशून्य मत घेणारा एकमेव उमेदवार

गडचिरोली : गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. दोन सख्ख्या जावांमध्ये काट्याची लढत झाली. प्रतिस्पर्ध्याचे जेवण विरोधकांनी चोरले. या घटनांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले. आता निकाल जाहीर झाला. या निकालात एका उमेदवाराला चक्क शून्य मतदान मिळाले. या उमेदवाराने स्वत:चं मतही स्वत:ला दिले नाही.

भाजपाचा कार्यकर्ता असलेल्या या उमेदवाराने बंडखोरी केली होती. मात्र, वरिष्ठांनी समजूत काढल्याने उमेदवाराने स्वत:चा प्रचार केला नाही. चंद्रपूर जिल्ह्यात सहा नगर पंचायतींचा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत गोंडपिपरी शहरात घडलेल्या मनोरंजक घटनांनी जिल्ह्याचे लक्ष वेधले. कार्यकर्त्यांना मेजवानी देणाऱ्या उमेदवाराचे जेवण विरोधकांनी लंपास केली. या घटनेने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असला तरी मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले.

आता आलेल्या निकालात एका उमेदवाराला शून्य मतदान मिळाले. या उमेदवाराने स्वत:चे मत स्वत:लाच दिले नाही. जितेंद्र इटेकर असे या उमेदवाराच नाव आहे. वार्ड नंबर दोनमधून एससी प्रवर्गातून इटेकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. इटेकर भाजपाचे कार्यकर्ता आहेत. त्यांनी पक्षाला उमेदवारी मागितली. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने इटेकर अपक्ष म्हणून राजकीय रिंगणात उतरले. मात्र, पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने त्यांनी स्वत:चा प्रचार केला नाही. शून्य मत घेणारे इटेकर जिल्ह्यातील एकमेव उमेदवार ठरले आहेत.

Web Title: Election jokes; 'That candidate' did not vote for himself, but someone stole the food of the opposition.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.