दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक पथक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:37 AM2021-01-19T04:37:51+5:302021-01-19T04:37:51+5:30
गडचिराेली : चामाेर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिराेंचा, भामरागड या सहा तालुक्यांमधील १५० ग्रामपंचायतींसाठी २० जानेवारी राेजी मतदान हाेणार आहेत. ...
गडचिराेली : चामाेर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिराेंचा, भामरागड या सहा तालुक्यांमधील १५० ग्रामपंचायतींसाठी २० जानेवारी राेजी मतदान हाेणार आहेत. यातील बहुतांश मतदान केंद्र संवेदनशील असल्याने निवडणूक पथकांना हेलिकाॅप्टरने साेमवारी रवाना करण्यात आल्या आहे.
गडचिराेली जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या जिल्ह्यात निवडणुका घेताना निवडणूक विभाग व पाेलीस प्रशासनाला अतिशय सतर्क राहावे लागते. त्यामुळेच उत्तरेकडील सहा तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात दक्षिणेकडील तालुक्यामध्ये २० जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. दक्षिणेकडील सर्वच तालुके नक्षलदृष्ट्या अधिक संवेदनशील आहेत. वेळेवर अडथळा येऊ नये, यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना हेलिकाॅप्टरने बेसकॅम्परवर पाेहाेचविण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना पाेलीस बंदाेबस्तात मंगळवारी मतदान केंद्राच्या ठिकाणी नेले जाणार आहे. तालुकास्थळाजवळच्या मतदान केंद्रांवर मंगळवारी पाेलिंग पार्ट्या रवाना हाेतील.
बाॅक्स
अतिरिक्त पाेलीस बल
नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रांवर पाेलिंग पार्ट्या कडक पाेलीस बंदाेबस्तात नेल्या जाणार आहेत, तसेच मतदान केंद्रांवर कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवला जाणार आहे. पाेलीस कर्मचारी कमी पडू नयेत, तसेच नक्षल्यांकडून काेणत्याही घातपाताची घटना घडू नये, यासाठीच सहा तालुक्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील अतिरिक्त पाेलीस ताफा मागविण्यात आला आहे. मागील दाेन ते तीन वर्षांमध्ये नक्षल्यांची ताकद कमी झाल्याने दुर्घटना टळत आहेत.
दक्षिणेकडील सहा तालुक्यांमधील १५० ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक हाेत आहे. एकूण २ लाख ४९ हजार ८३८ मतदार आहेत. यामध्ये महिला मतदार १ लाख २१ हजार ९५५ तर पुरुष मतदार १ लाख २७ हजार ७४१ आहेत. ४८६ प्रभागांमधून १ हजार १७० जागांसाठी २ हजार ८१५ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदानासाठी एकूण २ हजार १६६ कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ४८६ मतदान केंद्रांवर मतदान हाेणार आहे.
तालुकानिहाय मतदार
तालुका ग्रामपंचायत मतदान केंद्र मतदार
चामाेर्शी ६५ २०९ १,०६,१५४
मुलचेरा १४ ४८ ३१,६२७
अहेरी २८ ९६ ५३,६९१
भामरागड २ ६ २,३२०
सिराेंचा २७ ८१ ३३,९०७