३,४७० कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:36 AM2019-04-03T00:36:24+5:302019-04-03T00:37:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी जिल्हाभरातील ३ हजार ४७० अधिकारी व कर्मचाऱ्यांना ...

Election training to 3,470 employees | ३,४७० कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

३,४७० कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देतयारी अंतिम टप्प्यात : अनुपस्थित कर्मचाऱ्यांना बजावणार कारणे दाखवा नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी जिल्हाभरातील ३ हजार ४७० अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणाला ३२ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे त्यांना नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. ही सर्व उपकरणे व्यवस्थित हाताळता यावी, त्याचबरोबर निवडणूक विभागाच्या नियमानुसार मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाचे नियम त्यांना माहित असणे आवश्यक आहे. मतदानादरम्यान निवडणूक योग्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनाच पार पाडावी लागते. त्यामुळे निवडणुकीच्या कामावर नियुक्त झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देणे आवश्यक राहते.
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ३ हजार ७४० कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील १ हजार १९६ अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ८ कर्मचारी अनुपस्थित होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १ हजार ३७४ कर्मचाऱ्यांपैकी १३ तर अहेरी विधानसभा क्षेत्रातील १ हजार १६० कर्मचाºयांपैकी ११ अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

व्हीव्हीपॅटची माहिती
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वरील सेटींग संदर्भात उमेदवारांना माहिती देण्यात येत आहे. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व व्हीव्हीपॅट वरील उमेदवार सेटींग संदर्भात उमेदवार किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तींना २ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान माहिती दिली जाणार आहे.
यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मतदान करणे नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय आहे.

दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा
दिव्यांगाना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी प्रशासन विविध सुविधा पुरवित आहे. अंध, मुकबधिर, शारिरीक अपंग व इतर दिव्यांगांकरीता १६४ मतदान केंद्रांवर ३६५ व्हिलचेअर उपलब्ध असणार आहेत. दिव्यांगांना स्वयंसेवकांकडून मतदान केंद्रांवर मदत पुरविली जाणार आहे. यासाठी एन.सी.सी., एन.एस.एस. व स्काऊट गाईड यातील स्वयंसेवकांकडून मदत घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर रँम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात अंध ११४, मुकबधीर १२७, शारिरीक अपंग ४२७ इतर अन्य ३५ असे एकूण ७०३ अपंग मतदार आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात अंध १०३, मुकबधीर ७४, शारिरीक अपंग ४६९ इतर अन्य ४४ एकूण ६९१ मतदार आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात अंध ११३, मुकबधीर १०७, शारिरीक अपंग ४६९ इतर अन्य ९३ एकूण ८०२ मतदार आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ६२ मतदान केंद्रांवर १३४ व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ४९ मतदान केंद्रांवर व्हिलचेअर ४९ व अहेरी विधानसभा क्षेत्रातील ५३ मतदान केंद्रांवर १८२ व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे. व्हिलचेअरमुळे दिव्यांगांसाठी सोयीचे झाले आहे.

Web Title: Election training to 3,470 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.