जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:00 AM2021-11-25T05:00:00+5:302021-11-25T05:00:38+5:30

विभागीय आयुक्तांच्या २२ नोव्हेंबरच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची आणि चामोर्शी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

Election trumpets in nine Nagar Panchayats in the district | जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, १ डिसेंबरपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होणार असून २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, सर्व नगरपंचायतींची अंतिम प्रभागरचना आणि आरक्षणही बुधवारी निश्चित करण्यात आले. 
विभागीय आयुक्तांच्या २२ नोव्हेंबरच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची आणि चामोर्शी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

अहेरी

अहेरी नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १७, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग १३, अनुसूचित जमातीकरिता २ व ७, तर  अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ४, ९ आणि १६, नामाप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग) करिता प्रभाग १४, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १, ३, ५ आणि ८ तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक ६, १०, ११, १२ आणि १५ राखीव राहणार आहेत. 

सिराेंचा

सिरोंचा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक ४, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ८ व १७, अनुसूचित जमातीकरिता २, तर  अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ७, नामाप्रकरिता प्रभाग ११, नामाप्र (स्त्री) करिता प्रभाग ३, १२, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग १, ५, ६, व १० आणि सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग ९, १३, १५ आणि १६ राखीव राहतील. 

एटापल्ली

एटापल्ली नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग १०, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ३, अनुसूचित जमातीकरिता ६, ९, १२ आणि १३ तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ४, ७, ११ आणि १४, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग २, १५ आणि १६ तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १, ५, ८ आणि १७ जाहीर करण्यात आले आहेत.

भामरागड

भामरागड नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ४, अनुसूचित जमातीकरिता प्रभाग २, ३, ५, ६ आणि ११, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग १, ८, ९, १०, १४ आणि १६, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक ७, १३  आणि १७, तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १२ आणि १५ जाहीर करण्यात आले आहेत.

चामाेर्शी

चामोर्शी नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग ४, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ६, अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक १३, नामाप्रकरिता प्रभाग ८ व १०, नामाप्र (स्त्री) करिता प्रभाग ३ व ११, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग २, ७, ९, १२ आणि १६ तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १, ५, १४, १५ व १७ जाहीर करण्यात आले आहेत.

मुलचेरा

मुलचेरा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग १५, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ५, अनुसूचित जमातीकरिता १, ७, १० आणि १४, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ९, ११, १३, १६ आणि १७, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग २, ४, आणि १२ तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक ३, ६, आणि ८ जाहीर करण्यात आले आहेत.

धानाेरा

धानोरा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १७, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग १, अनुसूचित जमातीकरिता प्रभाग ६ आणि १० तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ४, १२ आणि १४, नामाप्रकरिता प्रभाग ५, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग ९, ११, १५ आणि १६ तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता २, ३, ७, ८ आणि १३ हे प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत.

कुरखेडा

कुरखेडा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १४, अनुसूचित जाती (स्त्री)करिता प्रभाग ४ आणि १३, अनुसूचित जमातीकरिता प्रभाग ९, अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ११ आणि १६, नामाप्रकरिता प्रभाग १७, नामाप्र (स्त्री) करिता प्रभाग ८, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग २, ३, ६, १२ आणि १५ तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १, ५, ७ आणि १० जाहीर करण्यात आले आहेत.

काेरची

कोरची नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग १२, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग ३ व ११ अनुसूचित जमातीकरिता प्रभाग ९, १३ आणि १५, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग २, ६, ८ आणि १७, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग ५, १०, १४ व १६, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १, ४, ७ जाहीर करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी कळविले.

 

Web Title: Election trumpets in nine Nagar Panchayats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.