तेलंगणात जाऊन हत्तीने घेतले दोघांचे बळी, सीमावर्ती भागात वनविभागाचा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:15 AM2024-04-05T11:15:21+5:302024-04-05T11:15:42+5:30

Gadchiroli News: छत्तीसगड राज्यातून गडचिरोलीत आलेल्या व कळपातून भरकटलेल्या एका रानटी हत्तीने बुधवारी तेलंगणात एंट्री केली.

Elephant killed two in Telangana, forest department alert in border areas | तेलंगणात जाऊन हत्तीने घेतले दोघांचे बळी, सीमावर्ती भागात वनविभागाचा अलर्ट

तेलंगणात जाऊन हत्तीने घेतले दोघांचे बळी, सीमावर्ती भागात वनविभागाचा अलर्ट

अहेरी (गडचिरोली) : छत्तीसगड राज्यातून गडचिरोलीत आलेल्या व कळपातून भरकटलेल्या एका रानटी हत्तीने बुधवारी तेलंगणात एंट्री केली. तेथे या हत्तीने धुडगूस घातला असून, सलग दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांचा पायांखाली चिरडून बळी घेतल्याने सीमावर्ती भागात वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ओडिशातून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी दोन डझन हत्तींनी शिरकाव केला.  गडचिरोलीतील  घनदाट जंगलात स्थिरावलेल्या हत्तींनी धानाचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण आहेत. हत्तींनी २०२३ मध्ये चार व चालू वर्षी तीन महिन्यांतच तीन बळी घेतले.  

ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर
- तेलंगणातील चिंतलामानेपल्ली तालुक्यातून या रानटी हत्तीने  बेजूर तालुक्यातील सुलुगूपल्ली परिसरात आपला मोर्चा 
वळविला आहे.   
- महाराष्ट्रातसुद्धा आलापल्ली वनविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि आरआरटी पथकाने    प्राणहिता नदीलगत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोधमोहीम 
सुरू केली आहे.

दोन शेतकऱ्यांचा बळी घेतलेले हे हत्ती  प्राणहिता नदीच्या सीमावर्ती भागात आहेत. कदाचित ते पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करून सीमावर्ती भागात येऊ शकतात. त्यामुळे गडअहेरी, चिंचगुंडी, वांगेपल्ली, कृष्णापूर, गेररा, महागाव येथे सतर्कता बाळगावी.   
 - राजेश पिंपळकर, क्षेत्र सहायक अधिकारी,  आलापल्ली, ता. अहेरी

Web Title: Elephant killed two in Telangana, forest department alert in border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.