अरे व्वा! हत्तीण माणसासारखे हापसून पिते हापसीतील पाणी; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 11:00 AM2021-06-06T11:00:57+5:302021-06-06T11:10:50+5:30
Elephant Video : हत्ती कॅम्पमधील रूपा ही हत्तीण चक्क माणसाप्रमाणे हापसीला (हातपंप) सोंडेने हापसून बाहेर येणारे पाणी पिते. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
कमलापूर (गडचिरोली) - घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील सर्वात मोठा हत्ती कॅम्प आहे याची कल्पना अनेकांना नसेल. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या या हत्ती कॅम्पमधील रूपा ही हत्तीण चक्क माणसाप्रमाणे हापसीला (हातपंप) सोंडेने हापसून बाहेर येणारे पाणी पिते. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
नैसर्गिक वातावरणात असलेल्या कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये सध्या 9 हत्ती आहेत. त्यातील रूपा नावाची 90 वर्षाची हत्तीण अनेक वेळा त्या परिसरात असलेल्या हापसीचा दांडा स्वतःच्या सोंडेने हापसून पाणी पित असल्याचा व्हिडिओ एका पर्यटकाने घेतला. रूपा अनेक वेळा या पद्धतीने पाणी हापसत असल्याचे तेथील वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कमलापूर (गडचिरोली) - अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या या हत्ती कॅम्पमधील रूपा ही हत्तीण चक्क माणसाप्रमाणे हापसीला (हातपंप) सोंडेने हापसून बाहेर येणारे पाणी पिते. #elephant#water#Videopic.twitter.com/5xOXMfMxYq
— Lokmat (@MiLOKMAT) June 6, 2021
विशेष म्हणजे या परिसरात मोकळ्या फिरणाऱ्या हत्तींसाठी एक छोटा तलावही आहे. पण रुपाला हापसीतील पाणी पिणे आवडते. सर्कसमध्ये शिकवलेले हत्ती फुटबॉल, क्रिकेट खेळताना आणि विविध करामती करताना पहायला मिळतात. पण कोणीही शिकवले नसताना माणसाचे अवलोकन करून त्याप्रमाणे करणारी ही रूपा हत्तीण कौतुकाचा विषय ठरली आहे.