हत्तींनी पुन्हा केली ट्रॅक्टरमधील धानाची नासधूस, रात्रभरात ५० पाेती केली फस्त

By गेापाल लाजुरकर | Published: November 24, 2023 09:48 PM2023-11-24T21:48:58+5:302023-11-24T21:49:23+5:30

शेतकऱ्यासह ट्रॅक्टरमधील सर्व मजुरांनी पळ काढल्याने रात्रीतून सर्व ५० ते ५५ पाेती धान हत्तींच्या कळपाने फस्त केली.

Elephants destroy paddy in tractor again, destroy 50 stalks overnight | हत्तींनी पुन्हा केली ट्रॅक्टरमधील धानाची नासधूस, रात्रभरात ५० पाेती केली फस्त

हत्तींनी पुन्हा केली ट्रॅक्टरमधील धानाची नासधूस, रात्रभरात ५० पाेती केली फस्त

गडचिराेली : आरमोरी तालुक्याच्या डार्ली येथील शेतकरी सदाशिव शंकर सडमाके हे २३ नाेव्हेंबर राेजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मळणी केलेले धान भाड्याच्या ट्रॅक्टरद्वारे घराकडे आणत हाेते. दरम्यान, एक रानटी हत्ती रस्त्यात आडवा आला. शेतकऱ्यासह ट्रॅक्टरमधील सर्व मजुरांनी पळ काढल्याने रात्रीतून सर्व ५० ते ५५ पाेती धान हत्तींच्या कळपाने फस्त केली.

सदाशिव सडमाके हे गुरूवारी रात्री ८ वाजता ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये धानाचे पाेते भरून घराकडे आणत हाेते. दरम्यान, अचानक वाटेतच एक रानटी हत्ती आला. त्यानंतर ट्रॅक्टरवर बसलेले चार ते पाच जण भयभीत होऊन रानटी हत्तीच्या भीतीपाेटी कसेबसे पळाले. नंतर गावात येऊन घटनेची माहिती दिली. काही नागरिकांनी हत्तींना पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कळपापुढे काहीच शक्य झाले नाही. संपूर्ण रात्रभर हत्तींनी ट्रॅक्टर ट्राॅलीमधील धानाच्या पाेत्यांची नासधूस केली. तोंडाजवळ आलेला घास रानटी हत्तींनी हिरावल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे वन विभागाने लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत. पंचनामा करताना मरेगावचे क्षेत्रसहायक आर.टी. समर्थ, खरपीचे वनरक्षक आर.पी. कुडावले, वनमजूर एन.एस. मुघाटे, ए.ए. ठाकूर उपस्थित होते.

Web Title: Elephants destroy paddy in tractor again, destroy 50 stalks overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.