अकराशे लोकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:21 PM2018-11-18T22:21:28+5:302018-11-18T22:21:45+5:30
वनविकास महामंडळाच्या वतीने जिमलगट्टा येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले. या शिबिरात सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने १ हजार १४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : वनविकास महामंडळाच्या वतीने जिमलगट्टा येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले. या शिबिरात सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने १ हजार १४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला.
आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या उपचारासाठी महागड्या शहरात जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन वनविकास महामंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. जिमलगट्टा परिसरातील अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. वनविकास महामंडळाच्या सीएसआर या निधीतून सदर आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली. या निधीतूनच शिबिराचा खर्च केला जाणार आहे. या शिबिराला दक्षिण चंद्रपूरचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, आलापल्लीचे उपवनसंरक्षक तूषार चव्हाण, जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, त्वचारोग तज्ज्ञ आदर्शलता सिंग, एफडीसीएमचे सहायक व्यवस्थापक एस.जी.सिंपले, नंदनवार, उईके, रामटेके, डॉ.सिंगोटे उपस्थित होते. शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शिबिराच्या आयोजना उद्देश सांगितला. त्यानंतर परिसरातील १ हजार १४२ नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी २५३ रुग्णांना सावंगी येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. पाच लाख रूपयांपर्यंतचा खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया सावंगी येथील रुग्णालयात एफडीसीएमच्या पुढाकाराने नि:शुल्क केल्या जातील. रुग्णांना ने-आण करण्याची व्यवस्थाही केली जाईल, असे अधिकाºयांनी सांगितले. शिबिराला परिसरातील ५० गावातील नागरिक उपस्थित होते. आभार एस.फुलझेले यांनी मानले. यशस्वीतेसाठी डीएफओ एस.आर.पाटील व एफडीसीएमच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.