अकरावी, बारावीचे शासकीय व्यावसायिक अभ्यासक्रम बंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:37 AM2021-02-10T04:37:23+5:302021-02-10T04:37:23+5:30
गडचिराेली : महाराष्ट्र राज्यातील ५३ शासकीय तंत्र माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या इयत्ता अकरावी, बारावीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ...
गडचिराेली : महाराष्ट्र राज्यातील ५३ शासकीय तंत्र माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या इयत्ता अकरावी, बारावीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे रूपांतर आयटीआयमध्ये करण्यात येणार आहे. परिणामी इयत्ता अकरावी, बारावीचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद हाेणार आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात राज्याच्या काैशल्य विकास, राेजगार व उद्याेजकता विभागाने ४ फेब्रुवारी २०२१ राेजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाचे सद्य:स्थितीत असलेल्या शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प कारागीर प्रशिक्षण याेजनेअंतर्गत व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार इयत्ता अकरावी, बारावीचे व्यावसायिक अभ्यासक्रम आयटीआयमध्ये रूपांतरीत हाेणार आहे.
बाॅक्स...
एक हजार विद्यार्थी घेतात शिक्षण
इयत्ता अकरावी, बारावीचे व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुविधा असलेली शासकीय आयटीआयमध्ये एक तुकडी सुरू आहे. याशिवाय खासगी व्यवस्थापनांचे १२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये २५ तुकड्या असून सर्व मिळून एकूण प्रवेश क्षमता ९८० विद्यार्थी इतकी आहे. शिक्षक व कर्मचारी जवळपास ५० नाेकरदार वेतनावर काम करीत आहे. येथील अभ्यासक्रम बंद झाल्यास विद्यार्थी अडचणीत येतील.
काेट...
व्यावसायिक अभ्यासक्रमातून राेजगार निर्मितीसाठी महाराष्ट्रासह इतर ठिकाणी माेठ्या संधी आहेत. माेठ्या शहरात नाेकरीची संधी आहे. शिवाय स्वत:चा व्यवसाय उभारता येतो. व्यावसायिक अभ्यासक्रमातून बारावीचे शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आता राेजगार मिळवित आहेत. विद्यार्थिनीही या अभ्यासक्रमाकडे वळत आहेत.
- राेहिणी वाटगुरे, विद्यार्थिनी
काेट...
गडचिराेली जिल्हा हा औद्याेगिकदृष्ट्या मागास आहे. शिवाय येथे बेराेजगारी माेठ्या प्रमाणात आहे. विना व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे बेराेजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्वयंराेजगार व आपला व्यवसाय उभारण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. सरकारने ते बंद करू नये.
- रमेश वाघमारे, विद्यार्थी