एफडीसीएम विरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:23 PM2018-03-11T23:23:49+5:302018-03-11T23:23:49+5:30

कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, वाढोणा सावलखेडा, कऱ्हाडी या गावातील ग्रामसभांची संयुक्त बैठक १० मार्चला शिरपूर ग्रामपंचायतीत पार पडली.

Elgar against FDCM | एफडीसीएम विरोधात एल्गार

एफडीसीएम विरोधात एल्गार

Next
ठळक मुद्देजंगलातच करणार उपोषण : ग्रामसभेत पाच गावातील लोकांचा एकमुखी निर्णय

ऑनलाईन लोकमत
वैरागड : कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, वाढोणा सावलखेडा, कऱ्हाडी या गावातील ग्रामसभांची संयुक्त बैठक १० मार्चला शिरपूर ग्रामपंचायतीत पार पडली. या ग्रामसभेत एफडीसीएममार्फत केली जाणारी वृक्षतोडीच्या विरोधात १३ मार्चपासून जंगलात उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
शिरपूर भागातील नागरिकांनी एकत्र येऊन एफडीसीएममार्फत होणारी वृक्षतोड थांबविली तसेच तीन ट्रॅक्टरही जप्त केले. त्यानंतर एफडीसीएमच्या अधिकाºयांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. मात्र अधिकारी न आल्याने लोक आक्रमक झाले आहे. पेसा अंतर्गत येणाºया गावातील जंगल परिक्षेत्रात वन संवर्धन १९८० च्या कायद्यान्वये केंद्र सरकार शाळा, दवाखाना, जलवाहिण्या, लहान सिंचन कालवे, गौण जलाशय या सुविधांसाठी वन जमीन खुली करण्याचा उल्लेख आहे. मात्र एफडीसीएमला प्रती हेक्टरी ७५ पेक्षा अधिक वृक्ष तोडता येत नाही, असा कायदा सांगतो. मात्र एफडीसीएमने मागील चार-पाच वर्षांपासून घनदाट जंगलाची कत्तल चालविली आहे. भगवानपूर, शिरपूरच्या जंगलात वन्यजीवांचा वावर असल्याने १९७२ च्या कायद्यान्वये एफडीसीएमला वन्य प्राण्यांना हानी पोहोचविणारी कृती करता येत नाही. मात्र एफडीसीएमने आपल्या बळाचा वापर करून जंगल नष्ट केले.त्या जागेत मानवीकृत रोपवन लावले. ग्रामीण जनतेचा तेंदू, मोह, डिंक, बेहडा आदी गौणवनोपजावर उदरनिर्वाह चालतो. मात्र एफडीसीएमतर्फे वनोपज नष्ट होत असल्याने ग्रामसभा एफडीसीएमच्या विरोधात एकवटल्या आहेत. १३ पासून उपोषण सुरू होणार आहे.

Web Title: Elgar against FDCM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.