जागतिक आदिवासी दिनी लोकबिरादरी प्रकल्पातील युवकांनी केला कुपोषणाविरुद्ध एल्गार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 07:00 AM2020-08-11T07:00:00+5:302020-08-11T07:00:20+5:30
9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमीत्त आदिवासी खाद्य संस्कृती जोपासण्याच्या हेतूने लोक बिरादारी प्रकल्पाने नवीन प्रयोगाचा शुभारंभ केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमीत्त आदिवासी खाद्य संस्कृती जोपासण्याच्या हेतूने लोक बिरादारी प्रकल्पाने नवीन प्रयोगाचा शुभारंभ केला. अमाप कष्ट आणि पैसा ओतून भामरागडचे शेतकरी धान पिकवत आहेत, पण अनेक अडचणी आणि बाजार भाव फार नसल्याने हवा तसा नफा काही मिळत नाही, परिणामी कुपोषण होते. पारंपरिक धान्य संवर्धन व लागवड ह्या उपक्रमाअंतर्गत ह्या दोन्ही संकटांवर मात साधता येतील.
ह्या प्रकल्पाअंतर्गत 18 ते 30 ह्या वयोगटातील तरुणांना स्वयं रोजगारची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
लोक बिरदारी प्रकल्पाच्या समीक्षा आमटे ह्यांनी अनेक दुर्गम गावांमध्ये जाऊन 5 पारंपरिक धान्याचे ( धान/तांदूळ सोडून) बिजाई गोळा केली आहे. तसेच विविध 7 डाळींची बिजाई देखील आहे. पहिल्या प्लॉटची लागवड सामुहिक श्रमदानातून मौजा जिंजगाव येथे करण्यात आली.
मनुज जिंदल, प्रकल्प अधिकारी, भामरागड ह्यांनी सदिछा भेट देऊन 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार केला.