पोटेगाव ग्रामपंचायतीत साडेपाच लाखांचा अपहार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:22+5:302021-06-25T04:26:22+5:30
पोटेगावचे प्रभारी सचिव आर. डी. शिवनकर यांच्याकडून जे. टी. शिवनकर यांनी प्रभार घेतला. त्यावेळी ग्रामपंचायतच्या १४व्या वित्त आयोगाच्या खात्यात ...
पोटेगावचे प्रभारी सचिव आर. डी. शिवनकर यांच्याकडून जे. टी. शिवनकर यांनी प्रभार घेतला. त्यावेळी ग्रामपंचायतच्या १४व्या वित्त आयोगाच्या खात्यात ९ लाख ४८ हजार ७५ रुपये शिल्लक होते. त्यानंतर मात्र जे. टी. शिवनकर यांनी आपल्या खोट्या सह्या करून १२ वेगवेगळ्या बिलांसाठी ५ लाख ५२ हजार ४५० रुपयांची उचल केली, असा आरोप प्रशासक बोडके यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
(बॉक्स)
मासिक सभेतही गरमागरम चर्चा
दरम्यान, पंचायत समितीच्या मासिक सभेत पोटेगाव ग्रामपंचायतमधील या घोळावर गरमागरम चर्चा झाली. १४वा वित्त आयोग आणि अबंध निधीसह ग्राम निधीमध्येही मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याने त्यांचीही चौकशी करण्याची मागणी उठली. पं. स. सदस्य मालताबाई मडावी यांनी याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार तसा ठरावही मासिक सभेत मंजूर झाल्याचे समजते.