उदयाेन्मुख नेतृत्व हरपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:34 AM2021-05-17T04:34:53+5:302021-05-17T04:34:53+5:30
राजीव सातव हे काॅंग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेले नेते हाेते. पंचायत समिती सदस्य ते आमदार, खासदार पदापर्यंत त्यांनी मजल ...
राजीव सातव हे काॅंग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेले नेते हाेते. पंचायत समिती सदस्य ते आमदार, खासदार पदापर्यंत त्यांनी मजल मारली. लाेकसभेत वेगवेगळ्या विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी केल्याने त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हाेते. राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय हाेते. महाराष्ट्रातून काेणताही काॅंग्रेस कार्यकर्ता दिल्लीत गेल्यास ते भेटायचे. कार्यकर्त्यांच्या समस्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पाेहाेचवित हाेते.
- डाॅ. नामदेव उसेंडी, माजी आमदार तथा काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष, गडचिराेली
राजीव सातव हे महाराष्ट्रातील राष्ट्रीय पातळीवरील उदयाेन्मुख नेतृत्व हाेते. राजकारणाबाबत त्यांचे नेहमी सकारात्मक विचार हाेते. त्यांची आणि माझी तीनवेळा भेट झाली. ते अतिशय मितभाषी हाेते. प्रत्येक मुद्दा चांगल्या पद्धतीने समजावून सांगत हाेते. लहान पदापासून माेठ्या पदावर गेल्याने त्यांना कार्यकर्ता काय असतो, याची जाणीव हाेती.
- डाॅ. प्रमाेद साळवे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस डाॅक्टर सेल
राजीव सातव हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे हाेते. ते मला प्रत्यक्ष ओळखत हाेते. लाेकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी ते धानाेरा येथे आले हाेते. राहुल गांधींपर्यंत आपले विचार पाेहाेचविण्याचे सातव हे एकमेव माध्यम हाेते. २०१४ मध्ये हिंगाेली येथे त्यांच्या प्रचारासाठी मी स्वत: गेलाे हाेताे.
- महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष युवक काॅंग्रेस, गडचिराेली
मी युवक काॅंग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना राजीव सातव यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी ते युवक काॅंग्रेसचे महासचिव हाेते. त्यानंतर ते युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. मित्रत्व जपणारे ते व्यक्ती हाेते. काॅंग्रेसी कार्यकर्ता हरपल्याचे दु:ख आहे.
- सतीश विधाते, काॅंग्रेस शहराध्यक्ष, गडचिराेली
राजीव सातव हे युवकांना प्रेरणा देणारे व्यक्ती हाेते. त्यांच्या अकाली निधनामुळे काॅंग्रेस पक्षाची माेठी हानी झाली आहे. वर्धेमध्ये आपली त्यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी काॅंग्रेसची विचारधारा काय आहे, हे समाजावून सांगून त्यानुसार काम करण्यास सांगितले हाेते.
- विश्वजित काेवासे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस