देसाईगंज तालुक्यात अझोला निर्मितीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:36+5:302021-06-09T04:45:36+5:30
अझोला अतिशय थोड्या अन्नावर उत्तम प्रकारे झपाट्याने वाढते. अझोलामध्ये नत्र व पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीत लवकर कुजतो व ...
अझोला अतिशय थोड्या अन्नावर उत्तम प्रकारे झपाट्याने वाढते. अझोलामध्ये नत्र व पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीत लवकर कुजतो व त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते. याच बाबीचा विचार करुन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) महेंद्र दोनाडकर यांनी कृषीमित्र व उपक्रमशील शेतकरी यांना मार्गदर्शन करून अझोलाचे प्रात्यक्षिक राबविण्याचा उपक्रम हाती घेतला. अझोला निर्मिती करताना कमीत-कमी खर्चात हा प्रयोग करण्याकरिता चार फूट रुंद, सहा फुट लांब व अर्धा फूट खोल खड्डा/टाके किंवा बेड तयार करुन त्यावर पाणी साठवणीसाठी प्लास्टिक किंवा ताडपत्रीचा वापर करण्यात येत आहे. याची सुरुवात देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील कृष्णा दोनाडकर यांच्याकडे अझोला टाके (बेड) तयार करुन झाली. देसाईगंज तालुक्यात आत्मा अंतर्गत सर्व कृषीमित्र व प्रगतशील शेतकरी सर्वांचे मिळून जवळपास ४० अझोला निर्मिती टाके (बेड) तयार करण्यात आले व त्यात अझोला निर्मिती सुरू आहे. हा उपक्रम राबविण्याकरिता आत्माचे प्रकल्प संचालक डाॅ. संदीप कऱ्हाळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. तसेच हे प्रकल्प प्रात्यक्षिक राबविण्यासाठी तालुक्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडळ अधिकारी रुपेश मेश्राम यांच्या प्रयत्नाने कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त प्रात्यक्षिक राबविण्यावर भर आहे.
कोट
अझोला हे हिरवळीचे खत असून यामध्ये नत्राचे प्रमाण अधिक आहे. रासायनिक खताच्या वाढत्या किमती लक्षात घेता १० टक्के रासायनिक खताच्या बचतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रासायनिक खताच्या खर्चामध्ये बचत करण्यासाठी अझोलाचा वापर करावा. यासाठी अझोला निर्मितीवर भर द्यावा.
नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी देसाईगंज
===Photopath===
070621\1815img-20210607-wa0048.jpg
===Caption===
अॕझोला निर्मिती टाके किंवा बेड दाखवितांना तुळशी येथिल कृषी मित्र.