गर्दी टाळण्यासाठी कोरचीच्या बँकेत टोकन पद्धतीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:00 AM2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:39+5:30

लॉकडाऊनच्या काळात गरिबांची परवड होऊ नये म्हणून प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलपासून पाचशे रुपये प्रती महिना असे तीन महिने पैसे जमा केले जाणार आहेत. २ महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. येथील शाखेमध्ये जवळपास चार हजार महिलांची खाती आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत.

Emphasis on token system in Korchi bank to avoid congestion | गर्दी टाळण्यासाठी कोरचीच्या बँकेत टोकन पद्धतीवर भर

गर्दी टाळण्यासाठी कोरचीच्या बँकेत टोकन पद्धतीवर भर

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात दोन सेवा केंद्र । फिजिकल डिस्टन्सिंगसह दोन कॅश काऊंटरची सोय

लिकेश अंबादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत टोकन पद्धतीद्वारेच व्यवहार केले जात आहेत. तसेच फिजिकल डिस्टंन्स, हातधुणी, माक्स, सॅनिटायझर आदींचा वापर करूनच सर्व व्यवहार पार पाडले जात आहेत. शिवाय पैसे काढण्याकरिता शहरात दोन ग्राहक सेवा केंद्रही उघडले आहे.
लॉकडाऊनच्या काळात गरिबांची परवड होऊ नये म्हणून प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलपासून पाचशे रुपये प्रती महिना असे तीन महिने पैसे जमा केले जाणार आहेत. २ महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. येथील शाखेमध्ये जवळपास चार हजार महिलांची खाती आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. सदर रक्कम काढण्याकरिता ग्रामीण भागातील ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून शाखा व्यवस्थापक राम गुप्तेश्वर यांनी शहरात दोन ग्राहक सेवा केंद्र उघडले.
आधारकार्डद्वारे राष्ट्रीयीकृत बँकेतील पैसे ग्राहकांना दिले जात आहे. तसेच बँकेतही दोन कॅश काऊंटर ठेवून ग्राहकांना पैसे दिले जात आहे. बँकेत प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दारावर पाणी आणि साबन हात धुण्यासाठी ठेवले आहे. बँकेच्या शेजारील व्हरांड्यात भरपूर जागा असल्यामुळे एकमेकांपासून अंतर ठेवण्यासाठी आखून ठेवलेल्या गोल रिंगणात ग्राहक उभे राहतात. बँकेमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना टोकन देऊन सोप्या पद्धतीने पैसे दिले जात आहे. बँकेत कमी कर्मचारी असूनसुद्धा सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत जवळपास अडीचशेच्यावर ग्राहकांना रोकड दिली जात आहे. सुरळीत व्यवहार करण्यासाठी शाखा व्यवस्थापक राम गुप्तेश्वर, उप व्यवस्थापक विक्की वरखेडे, शुभम मोटघरे, रोखपाल उमाजी सिडाम, लिपिक विजय भलावी आदी प्रयत्न करीत आहेत.

गर्दी नियंत्रणासाठी पोलीस तैनात
कोरची येथील बॅक ऑफ इंडियाच्या शाखेत ग्राहकांची गर्दी उसळून अनुचित प्रकार घडू नये व गर्दीचे नियंत्रण व्हावे यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दी नियंत्रण करणे सोपे झाले आहे.

Web Title: Emphasis on token system in Korchi bank to avoid congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.