शाळा पूर्वतयारीसह लसीकरण जनजागृतीवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:25 AM2021-06-29T04:25:01+5:302021-06-29T04:25:01+5:30

शाळा पूर्वतयारी संबंधाने कुरूड केंद्राची नियोजन सभा गुरुवारी पार पडली. या सभेत गटशिक्षणाधिकारी कुचिक मार्गदर्शन करीत हाेत्या. कुरूड केंद्रातील ...

Emphasize vaccination awareness with school preparation | शाळा पूर्वतयारीसह लसीकरण जनजागृतीवर भर द्या

शाळा पूर्वतयारीसह लसीकरण जनजागृतीवर भर द्या

Next

शाळा पूर्वतयारी संबंधाने कुरूड केंद्राची नियोजन सभा गुरुवारी पार पडली. या सभेत गटशिक्षणाधिकारी कुचिक मार्गदर्शन करीत हाेत्या. कुरूड केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद शिक्षकांची शाळा पूर्वतयारी नियोजनाबाबत सहविचार सभा गट साधन केंद्रात आयोजित करण्यात आली हाेती. या सभेला केंद्रप्रमुख विजय बन्सोड, विद्या निकेतनचे मुख्याध्यापक देवराव भोसकर, जिल्हा परिषद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री पराते, रेणुकाबाई शाळेचे ओमप्रकाश लेनगुरे, तिरुपतीचे दाऊदसरिया आदी उपस्थित हाेते. सभेमध्ये सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समिती सभा, नवागतांचे स्वागत, इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या गृहभेटी, लसीकरण जाणीव-जागृती, गावातील प्रतिष्ठांच्या भेटी व १ जुलैपासून शाळा सुरू करता येतील काय? यावर समिती सदस्य व पालकांशी विचारमंथन करून मार्गदर्शन करण्यात आले. सभेचे संचालन विषय शिक्षक संतोष टेंभुर्णे यांनी केले तर आभार प्रगुलास शेंडे यांनी मानले. सभेला गटसाधन केंद्रातील जितेंद्र पटले, अलका सोनेकर, होमा शहारे, वैशाली खोब्रागडे, रणजित चौधरी यांच्यासह शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.

===Photopath===

270621\5554img-20210627-wa0016.jpg

===Caption===

शाळेच्या पूर्वतयारी सह लसीकरणावर भर द्या :

गटशिक्षणाधिकारी निर्मला कुचिक

# कुरुड केंद्राची शाळापूर्वतयारी नियोजन सभा

Web Title: Emphasize vaccination awareness with school preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.