पेपरमिलमध्ये सर्वच कामगारांना काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:03+5:302021-09-27T04:40:03+5:30

पेपरमिल २०१६ पासून बंद पडलेली आहे. त्यानंतर दोन वर्षांनी काही कामगारांना बल्लारपूर येथे पाठविण्यात आले आहे. मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांना ...

Employ all workers in the papermill | पेपरमिलमध्ये सर्वच कामगारांना काम द्या

पेपरमिलमध्ये सर्वच कामगारांना काम द्या

Next

पेपरमिल २०१६ पासून बंद पडलेली आहे. त्यानंतर दोन वर्षांनी काही कामगारांना बल्लारपूर येथे पाठविण्यात आले आहे. मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले. काम नसल्याने कुटुंबाचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे. पेपरमिलमधील बी.जी.पी.एल. युनिटमधील ए फोर साइज कटिंग मशीन होती. तीही आता हलविण्यात आली आहे. या युनिटमध्ये काम करणा-या स्थायी कर्मचाऱ्यांना येथून पेपरमिलच्या वाहनाने रोज बल्लारपूर येथे जाणे-येण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचारी यांच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे. तेव्हा स्थायी कामगारांनाच नाही तर सर्वच कामगारांना काम देण्यात यावे, अन्यथा या ठिकाणाहून एकही वाहन जाऊ देणार नाही, असा इशारा जि.प. सदस्य रूपाली पंदिलवार व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी दिला आहे.

Web Title: Employ all workers in the papermill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.