कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:21 AM2019-01-11T00:21:34+5:302019-01-11T00:23:14+5:30

पंचायत समिती आरमोरी येथे कर्मचाऱ्यांची व्यसनमुक्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये दारू व तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.

Employee's Addiction Decline | कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ

कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ

Next
ठळक मुद्देमुक्तीपथकडून मार्गदर्शन : आरमोरी पंचायत समितीत कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : पंचायत समिती आरमोरी येथे कर्मचाऱ्यांची व्यसनमुक्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये दारू व तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. त्यानुसार बुधवारी आरमोरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. मुक्तीपथ चमूतर्फे यमराजाचा फास हा लघुचित्रपट दाखवून तंबाखूचे गंभीर परिणाम समजावून सांगण्यात आले. दारू व तंबाखूमुक्त कार्यालय करण्यासाठी जे १२ निकष ठरविण्यात आले आहेत, ते सांगण्यात आले. दारू व तंबाखूमुक्तीचे काम पाहण्याची जबाबदारी आरोग्य सेवक ए. बी. पठाण यांच्याकडे सोपविण्यात आली. पंचायत समिती परिसरात असलेल्या पानठेलेधारकांना नोटीस बजावून तंबाखूविक्री बंद करण्याचे आदेश गट विकास अधिकारी यांनी दिले. तंबाखू विकणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रास्ताविकादरम्यान गट विकास अधिकारी वाय. व्ही. मोहितकर यांनी दारू व तंबाखू हे व्यसन मानवाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. शासकीय कार्यालयात सेवा देताना कर्मचाऱ्यांनी स्वत: निर्व्यसनी राहून सेवा द्यावी, शासकीय कार्यालयात येणाºया सामान्य नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाईल. आपले कार्यालय व्यसनमुक्त व स्वच्छ ठेवणे ही सर्वच कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मोहितकर यांनी केले.
संचालन ए. बी. पठाण यांनी केले. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून आरमोरी मुक्तीपथ कार्यालयाचे तालुका संघटक निलम हरीणखेडे, तालुका प्रेरक प्रकाश कुनघाडकर यांनी काम पाहिले.

Web Title: Employee's Addiction Decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.