कर्मचाऱ्यांनो, आंदोलनासाठी सज्ज राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:47 PM2018-02-26T23:47:10+5:302018-02-26T23:47:10+5:30
कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना, शाळेचे अनुदान, वरिष्ठ व निवड श्रेणी, अंशदायी पेंशन योजना आदीसह विविध प्रश्न शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असून याबाबत संघटनेने शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना, शाळेचे अनुदान, वरिष्ठ व निवड श्रेणी, अंशदायी पेंशन योजना आदीसह विविध प्रश्न शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असून याबाबत संघटनेने शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांबाबत राज्य सरकार कमालीचे असंवेदनशील आहे, असा आरोप करीत आपले हक्क मिळवून घेण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. सरकार विरोधात होणाºया आंदोलनासाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन विमाशिसंचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले.
स्थानिक जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी आयोजित विमाशिसंच्या जिल्हा अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांतीय उपाध्यक्ष लक्ष्मणराव धोबे होते. प्रमुख अतिथी म्हणून क्रांतीय कोषाध्यक्ष सूर्यकांत भोंगळे, प्राचार्य सुनील चंदनगिरीवार, श्रीधर खेडीकर, अविनाश बढे, अबुझमाड शिक्षण संस्थेचे सचिव समशेर खॉ पठाण, प्राचार्य टी.के. बोरकर, शेमदेव चापले, रामदास टिकले, अॅड. गोविंद भेंडारकर, श्रीहरी शेंडे, ठाकरे, रामराज करकाडे, सुधा ढगे, दिलीप वर्भे, श्रीहरी शेंडे, दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, यशवंत रायपुरे, यादव बानबले, अविनाश चडगुलवार, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे आदी उपस्थित होते.
यावेळी सिनेट सदस्य अजय लोंढे, प्रा. संध्या येलेकर तसेच अजय बतकमवार, दीपक धोपटे, शेरकी, भेंडारकर आदींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन किशोर पाचभाई, प्रास्ताविक अजय लोंढे तर आभार निमजे यांनी मानले.