कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:54 AM2018-03-28T00:54:20+5:302018-03-28T00:54:20+5:30
विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामसोर मंगळवारी दुपारी २ वाजता धरणे आंदोलन केले.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामसोर मंगळवारी दुपारी २ वाजता धरणे आंदोलन केले.
सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी सुरू केलेली नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. सातवा वेतन आयोग लागू करावा, महागाई भत्त्याची रक्कम द्यावी, भाववाढ रोखण्यास उपाययोजना करावी, बेरोजगारी कमी करावी, कंत्राटी कर्मचाºयांना सेवेत कायम करावे, आयकराची उत्पन्न मर्यादा वाढवावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. चडगुलवार, कार्याध्यक्ष ए. आर. गडप्पा, सरचिटणीस भास्कर मेश्राम, सहसचिव एस. के. बावणे, संजय मैंद, प्रसिध्दी प्रमुख चंदू प्रधान, विनोद मैंद, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतीफ पठाण, किशोर सोनटक्के यांनी केले.