महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:39+5:302021-08-02T04:13:39+5:30
सर्वप्रथम अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शासनाने २००२ पासून महसूल ...
सर्वप्रथम अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शासनाने २००२ पासून महसूल दिन साजरा करण्याचे घाेषित केले. तेव्हापासून १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून पाळला जाताे. राज्याच्या गतिमान प्रशासनामध्ये महसूल विभाग सातत्याने अग्रस्थानी आहे. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती या काळात महसूल विभाग अहोरात्र काम करीत असतो. तसेच राज्यापासून खेडेगावापर्यंत शासनाची धुरा सांभाळणारा महसूल विभाग शासनाच्या अनेक विभागांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत असतो. महसूल सप्ताहात आपल्या तालुक्यातून सर्वाधिक महसूल गोळा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सी. जी पित्तुलवार यांनी केले.
२०२०-२१ या वर्षात महसूल प्रशासनाला लोकाभिमुख व गतिमान करण्याकरिता तसेच कोविड-१९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे महसूल कर्मचारी, तलाठी, कोतवाल यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन वनिश्याम येरमे यांनी केले, तर आभार सावरगावचे तलाठी दीपक मेश्राम यांनी मानले.