देसाईगंज तालुक्यात ७,५०० कुटुंबांना राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:14+5:302021-03-14T04:32:14+5:30
पूर्वी जास्त प्रमाणात महिला मिरची तोडणी करीता परराज्यात जात असत. पण अनेकांनी कोरोनाचे संकट कोसळले असल्याने रोजगार हमी योजनेला ...
पूर्वी जास्त प्रमाणात महिला मिरची तोडणी करीता परराज्यात जात असत. पण अनेकांनी कोरोनाचे संकट कोसळले असल्याने रोजगार हमी योजनेला पसंती दर्शवत रोजगार हमीच्या कामावर हजेरी लावत आहेत. तहसील यंत्रणा व पंचायत यंत्रणा दोन स्तरावर काम सुरू करण्यात आली आहेत. तालुक्यात तहसील यंत्रणांची ११ कामे तर पंचायत स्तरावरही काही कामे सुरू आहेत. यामध्ये भातखाचार, मजगी, नाला खोलीकरण, घरकूल , तलावाचे खोलीकरण, एकेरीकरण आदी कामांचा समावेश आहे.
एकूण १ लाख ७१ हजार मनुष्य दिवस राेजगाराची निर्मिती झाली. त्यापैकी ८५ हजार मनुष्य दिवस राेजगार महिलांनी केले आहेत. यावरून राेजगार हमी याेजनेच्या कामावर महिलांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.