रोजगार हमी योजनेमुळे सिंचन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:21 AM2018-06-18T00:21:06+5:302018-06-18T00:21:06+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात सिंचनाची विविध कामे करण्यात आली. मागील पाच वर्षात जवळपास ५०० कामे करण्यात आली असून यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे.

Employment Guarantee Scheme increased irrigation | रोजगार हमी योजनेमुळे सिंचन वाढले

रोजगार हमी योजनेमुळे सिंचन वाढले

googlenewsNext
ठळक मुद्देशेततळे, बोडी दुरूस्तीला अधिक प्राधान्य : भात खाचर निर्मितीमुळे धानाचे क्षेत्र वाढण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात सिंचनाची विविध कामे करण्यात आली. मागील पाच वर्षात जवळपास ५०० कामे करण्यात आली असून यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्याचबरोबर शेतीचा विकास व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची अत्यंत कमी साधने उपलब्ध असल्याने वर्षभर रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी होते. रोजगार हमी योजनेचा निधी विशेष करून सिंचनाची कामे, पांदन रस्ता, धान बांध्या तयार करणे, बोडी, मामा तलावाची दुरूस्ती करणे आदी बाबींवर खर्च केला जातो. मागील पाच वर्षांत रोजगार हमी योजनेतून जी कामे करण्यात आली, त्यामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध होणाऱ्या बाबींवर विशेष खर्च करण्यात आला आहे. २०१३-१४ या वर्षात एकूण ३६ शेततळे बांधण्यात आले. त्यावर १९ लाख रूपये खर्च झाले. २५ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली. त्यावर १२ लाख ७६ हजार रूपये खर्च झाले. सात मातीचे बंधारे बांधण्यात आले. त्यावर १७ लाख रूपये खर्च झाले. २३ शेतकºयांच्या शेतात धानाच्या बांध्या तयार करण्यात आल्या. त्यावर २३ लाख रूपये खर्च झाले. तर २१ जुन्या धानाच्या बांध्यांची दुरूस्ती करण्यात आली. २०१३-१४ या वर्षात एकूण ११२ सिंचनाची कामे करण्यात आली. त्यावर ८७ लाख ३६ हजार रूपये खर्च झाले आहे. २०१४-१५ या वर्षात ७९ कामे करण्यात आली. त्यावर १ कोटी ५ लाख रूपये खर्च झाले. २०१५-१६ या वर्षात ११५ कामे करण्यात आली. त्यावर दीड कोटी रूपये खर्च झाले. सन २०१६-१७ या वर्षात एकूण १२६ कामे करण्यात आली. त्यावर १ कोटी ४१ लाख रूपये खर्च झालेत. २०१७-१८ या वर्षात एकूण १३१ कामे पूर्ण झाली. झालेल्या कामांमध्ये चार शेततळे, सहा बोड्या, एक नाला, ९१ धानाच्या बांध्यांची निर्मिती व २९ जुन्या धानाच्या बांध्यांची दुरूस्ती करण्यात आली.
धान शेतीला लाभदायक
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. या पिकाला अगदी सुरूवातीपासून ते पीक निघेपर्यंत पाणी द्यावे लागते. त्यामुळे हे पीक घेताना सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. सिंचनासाठी मामा तलाव व बोड्या आहेत. मात्र सदर मामा तलाव व बोड्या अत्यंत जुन्या आहेत. काही बोड्यांची पाळ फुटली आहे. त्याचबरोबर बोडींमध्ये गाळ साचल्याने बोडींची पाणी साठवण क्षमता कमी होती. या बोड्या दुरूस्त करणे आवश्यक होते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बोड्यांची दुरूस्ती झाल्याने पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे.

Web Title: Employment Guarantee Scheme increased irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती