एसआरपीएफच्या स्थापनेने राेजगाराच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:35 AM2021-07-29T04:35:48+5:302021-07-29T04:35:48+5:30
तालुक्यातील विसोरा नजीकच्या राज्य राखीव पोलीस दलात वर्तमान स्थितीत जवळपास ५०० एसआरपीएफ जवान व त्यांचे कुटुंबीय धरुन किमान तीन ...
तालुक्यातील विसोरा नजीकच्या राज्य राखीव पोलीस दलात वर्तमान स्थितीत जवळपास ५०० एसआरपीएफ जवान व त्यांचे कुटुंबीय धरुन किमान तीन हजार लाेक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. भविष्यात ही संख्या वाढविली जाणार आहे. या ठिकाणी ९०० निवासस्थाने प्रस्तावित आहेत. किमान तेवढेच पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मिळून किमान सहा हजार नागरिक वास्तव्यास राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना जोडधंदा करुन आर्थिक उन्नती साधण्यास बराच वाव आहे. राज्य राखीव पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूसह कपडा, किराणा, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल्स वस्तू खरेदी करण्यासाठी तद्वतच भाजीपाला,फळ-फळावळ खरेदी करण्यासाठी देसाईगंज शहरावर अवलंबून राहावे लागणार आहे.
राज्य राखीव पोलीस दलामार्फत अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येण्यासोबतच परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण, स्पर्धा परीक्षेची तयारी, ग्रंथालय, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण तसेच विविध खेळात नैपुण्य प्राप्त करता यावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
270721\4110img-20210616-wa0031.jpg
देसाईगंज नजीकच्या सीआरपीएफच्या प्रांगणात बनत असलेल्या वसाहती