ताडी हंगामातून अनेकांना राेजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:35 AM2021-02-13T04:35:21+5:302021-02-13T04:35:21+5:30

भामरागड : माणसाच्या आराेग्यासाठी अतिशय लाभदायक असणाऱ्या ताडी पेय विक्रीच्या हंगामास भामरागड तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात सुरुवात झाली ...

Employs many from the palm season | ताडी हंगामातून अनेकांना राेजगार

ताडी हंगामातून अनेकांना राेजगार

Next

भामरागड : माणसाच्या आराेग्यासाठी अतिशय लाभदायक असणाऱ्या ताडी पेय विक्रीच्या हंगामास भामरागड तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात सुरुवात झाली आहे. ताडी पेय हंगामाच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडाे नागरिकांना राेजगार मिळत आहे. उन्हाळ्यामध्ये ताडीची मागणी वाढत असल्याने नागरिकांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असते. ताडी व गाेरगा हे दाेन वृक्ष अतिशय दुर्मीळ समजले जात असले तरी भामरागड तालुक्याच्या लाहेरी व इतर भागात या दाेन्ही वृक्षांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात ताडी पेय उपलब्ध हाेत आहे. जानेवारीपासून तर मे महिन्यापर्यंत साधारणत: पाच महिने ताडी पेयाचा हंगाम राहणार आहे. शहरी भागातील नागरिकांना ताडीचे विशेष आकर्षण आहे. ताडी हे पेय चवीला चांगले असून, आराेग्यासाठी लाभदायक असल्याने याला माेठी पसंती आहे.

Web Title: Employs many from the palm season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.