कापडी पिशव्या शिलाईतून महिलांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:23 AM2021-07-03T04:23:22+5:302021-07-03T04:23:22+5:30
गडचिरोली येथील गंधर्य स्वयंसहाय्यता महिला बचत गट रामनगर, तथा सूर्यवंशी महिला बचत गट सुभाष वाॅर्ड गडचिरोली, देसाईगंज येथील ...
गडचिरोली येथील गंधर्य स्वयंसहाय्यता महिला बचत गट रामनगर, तथा सूर्यवंशी महिला बचत गट सुभाष वाॅर्ड गडचिरोली, देसाईगंज येथील आधार स्वयंसहाय्यता महिला बचत गट कस्तुरबा वाॅर्ड, प्रेरणा स्वयंसहाय्यता महिला बचत गट शिवाजी वाॅर्ड, मैत्री स्वयंसहाय्यता महिला बचत गट हनुमान वाॅर्ड तथा अन्य गटातील सदस्यांना कापडी पिशव्या शिलाईच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. तेजोमय लोक संचालित साधन केंद्रामार्फत १० हजार कापडी पिशव्या शिलाईचे काम सुरू आहे. प्लास्टिकमुक्त कार्यक्रमाचा प्रसार व प्रसिद्धीचा भाग म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कापडी पिशव्या शिलाईचे काम ३८ गरीब व गरजू महिलांना देण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी सखी लोक संचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक रोषण नैताम आणि तेजोमय लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका व त्यांचा चमू सहकार्य करीत आहे.