आंबा पिकातून समृद्धी साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:55 AM2018-05-26T00:55:45+5:302018-05-26T00:55:45+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले.

Empowerment from mango crop | आंबा पिकातून समृद्धी साधा

आंबा पिकातून समृद्धी साधा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : महोत्सवात विविध प्रकारच्या आंब्यांनी वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नीत कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे आंबा महोत्सव २५ मे रोजी संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, फळबाग विभाग प्रमुख डॉ. एस. जी. भराड, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. एस. व्ही. घोलप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी स्थानिक वाणाचा जिल्ह्यासह जिल्हाबाहेर प्रचार करावा, जेणेकरून आंब्याची मागणी वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले. आंबा पीक तज्ज्ञ डॉ. एस. आर. पाटील म्हणाले, गडचिरोली जिल्हा विदर्भातील नंदनवन आहे. या ठिकाणी फळ पीकात भरपूर प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मुख्यत: आंबा, जांभूळ, फणस इत्यादींमध्ये आजच्या बदलत्या वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता याच पिकांमध्ये आहे. हीच जैवविविधता येथील शेतकरी बांधवांना त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याकरिता मदतीचा स्त्रोत होऊ शकतो. प्रत्येक फळझाडामध्ये रासायनिक पदार्थांचा उपयोग करून त्यांना अनैसर्गिकरित्या मानवाच्या उपयोगासाठी वापरल्या जाते. हे मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. यावर एकमेव उपाय म्हणून नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या फळांचा आहारात वापर करावा.
डॉ. ए. जी. भराड म्हणाले की, पूर्व विदर्भातील हवामान व जमिनीची पात्रता बघितली तर शेतकरी जर फळबागेकडे वळले तर नक्कीच यशस्वी होऊ शकतील, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम समन्वयक संदीप कराडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात बेंगनपल्ली, रत्ना, दशेहरी, केसर, कलेक्टर, सीईओ आदी प्रकारचे वाण असल्याचे सांगितले. संचालन डॉ. अनिल तारू यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व विषय विशेषज्ञ व अधिकाºयांनी सहकार्य केले.
चांगले वाण उपलब्ध करा
सिरोंचा येथील शेतकरी विश्वेश्वरराव कोंड्रा यांनी कोकणामध्ये जसे अल्फासो या ब्रिटीश अधिकाºयाने हापूस आंब्याची रोपे वाटली. त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुध्दा आंब्याचे व इतर पिकांचे चांगले वाण उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. प्रत्येक तालुकास्तरावर रोपवाटीका तयार केल्यास त्या ठिकाणावरून शेतकऱ्यांना फळांची झाडे मिळतील, अशी मागणी शेतकºयांनी केली.

Web Title: Empowerment from mango crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा