हक्कातून ग्रामसभांना सक्षम बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:57 PM2018-02-01T23:57:57+5:302018-02-01T23:58:15+5:30
भारतीय संविधानाच्या अनुसूची ५ व ६ तसेच २४४ नुसार ग्रामसभांना विशेष अधिकार मिळाले आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासींवर आपल्या अधिकार व हक्कापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : भारतीय संविधानाच्या अनुसूची ५ व ६ तसेच २४४ नुसार ग्रामसभांना विशेष अधिकार मिळाले आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासींवर आपल्या अधिकार व हक्कापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे. त्यामुळे आदिवासी बांधव संघटीत होऊन आपली संस्कृती वाचविण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसभांना सक्षम बनवावे, असे प्रतिपादन डॉ. योगाजी कराडे व अन्य मान्यवरांनी केले.
पारंपरिक इलाका ग्रामसभा मुरूमगाव व कटेझरी क्र. २ व तालुक्यातील न्याहाळकल ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी टिपागड देवस्थानात यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सदर कार्यक्रमात टिपागड यात्रा देवी, देवतांची पूजा व आदिवासी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गाव प्रमुख महागू पुलो यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी मुरूमगाव जमिनदारीचे प्रमुख भूपेंद्रशहा मडावी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंडियन ट्रायबल व्हॅलेंटिअर आर्गनायझेशनचे संघटनप्रमुख विजय सिडाम, अॅड. उमेश मडावी, हरीश सिडाम, श्यामराव कतलामी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य अनिल केरामी, गंगाराम आतला, वासुदेव आतला, गणपत कोल्हे, महिला ग्रामसभा अध्यक्ष छाया पोटावी, चम्पा होळी, सुशीला कुडो, ईश्वर कुमरे, संतोष एका, रूपसिंग हिडको, डॉ. बन्सोड, डॉ. नंदू मेश्राम, मतलाम नैताम, राजाराम गोटा, सुखरू कड्यामी, हिरामन हलामी, मुकेश नरोटे, लालसाय तुलावी आदी हजर होते.
नृत्यातून संस्कृतीचे दर्शन
सदर यात्रा महोत्सवात आदिवासी नागरिकांनी पारंपरिक नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना घडविले. येथे महाराष्टÑ, छत्तीसगडसह बंदूर, दराची, बोटेझरी, कटेझरी, दर्रेकसा भागातील शेकडो आदिवासी बांधव हजर होते.