गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम करा

By admin | Published: September 22, 2016 02:27 AM2016-09-22T02:27:12+5:302016-09-22T02:27:12+5:30

पेसा कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील तर सामुहिक वनहक्क कायद्याने बिगर पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना तेंदू, बांबूची तोड,

Enable the villages financially | गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम करा

गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम करा

Next

अधिकाऱ्यांचे आवाहन : पोटेगावात तेंदू, बांबू व्यवस्थापनावर कार्यशाळा
गडचिरोली : पेसा कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील तर सामुहिक वनहक्क कायद्याने बिगर पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना तेंदू, बांबूची तोड, विक्री व व्यवस्थापन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. या व्यवस्थापनात जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून ग्रामसभांनी चढ्या दराने बांबू व तेंदूची विक्री करावी, गाव विकासासाठी भरघोस उत्पन्नातून गावांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे, असे आवाहन उपस्थित वनाधिकारी व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केले.
सन २०१६-१७ या वर्षात तेंदू आणि बांबूची तोड, विक्री आणि व्यवस्थापनाबाबत ग्रामसभा कोष व साधनसंपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव यांची कार्यशाळा पोटेगाव येथील सांस्कृतिक भवनात मंगळवारी पार पडली. या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून चातगावचे वन परिक्षेत्राधिकारी कैदलवार, गडचिरोलीचे पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, जिल्हा पेसा समन्वयक नितीन वाघमारे, वन परिक्षेत्राधिकारी कंगाले, होकम, तुपे, घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तेंदू व बांबू तोड लिलाव प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्यासाठी ग्रामसभेच्या अध्यक्ष व सचिवांना वन परिक्षेत्राधिकारी कैदलवार व पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या संदर्भात ग्रामसभांना येणाऱ्या अडचणींवरही चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेला देवापूर, जामगाव, राजोली, मारदा, मारोडा, पोटेगाव, वाकडी, चांदाळा, मुडझा, सावेला, विहीरगाव येथील पदाधिकारी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक रतन शेंडे, संचालन दीपक कांबळे यांनी केले तर आभार प्रवीण दुर्गे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Enable the villages financially

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.