वनौषधी लागवडीसाठी प्रोत्साहन द्या
By admin | Published: July 10, 2017 12:37 AM2017-07-10T00:37:23+5:302017-07-10T00:37:23+5:30
वनौषधीची लागवड कशी करावी, ती लोकांना उपयुक्त कशी ठरेल याबाबत मार्गदर्शन करून वनौषधी लागवडीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
आमदारांचे आवाहन : वैदू संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : वनौषधीची लागवड कशी करावी, ती लोकांना उपयुक्त कशी ठरेल याबाबत मार्गदर्शन करून वनौषधी लागवडीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
चामोर्शी येथे सामाजिक वनीकरण उद्यानात रविवारी मेक इन गडचिरोलीच्या पारंपरिक वैद्य मंडळाच्या वतीने प्रशिक्षणार्थी वैदु संमेलनात ते बोलत होते. यावेळी अशोक पोरेड्डीवार, डॉ. बिधान देवरी, उपसरपंच अजय मंडल, योग प्रचारक, विष्णू, कालिपद मंडल, गोवर्धन आदे उपस्थित होते.
यावेळी डॉ. देवरी यांनी मार्गदर्शन केले. चामोर्शी येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या बाजूला मेक इन गडचिरोली अंतर्गत जिल्ह्यात प्रथमच चिकित्सालय सुरू करण्यात आले. या चिकित्सालयाचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा संयोजक रमेश अधिकारी, चिकित्सा केंद्राचे संचालक माणिक बनीक, मंटू हलदर, झोडे, भोवरे, जुवारे यांनी सहकार्य केले.