सिरोंचात अतिक्रमण हटविले

By admin | Published: October 2, 2016 01:57 AM2016-10-02T01:57:59+5:302016-10-02T01:57:59+5:30

सिरोंचा शहराच्या प्रवेशद्वारावर, बसस्थानकाच्या बाजूला महसूल विभागाच्या मोकळ्या जागेत गेल्या २० वर्षांपासून अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपले दुकान थाटले होते.

Encroachment deleted at the end | सिरोंचात अतिक्रमण हटविले

सिरोंचात अतिक्रमण हटविले

Next

२० वर्षांपासून होते अतिक्रमण : नगर पंचायत व महसूल विभागाची संयुक्त कारवाई
सिरोंचा : सिरोंचा शहराच्या प्रवेशद्वारावर, बसस्थानकाच्या बाजूला महसूल विभागाच्या मोकळ्या जागेत गेल्या २० वर्षांपासून अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपले दुकान थाटले होते. महसूल व नगर पंचायत प्रशासनाने संयुक्तरीत्या शुक्रवारी धडक मोहीम हाती घेऊन या परिसरातील अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने हटविले.
सदर जागेवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पानटपरी, हॉटेल व इतर दुकाने थाटली होती. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भरत नंदनवार यांनी रस्ता रूंदीकरण व नगर विकासाच्या दृष्टीकोणातून महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सदर अतिक्रमीत जागेवरील अतिक्रमण हटविले. त्यानंतर मुख्याधिकारी नंदनवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अतिक्रमीत जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांनी सदर जागा बळकाविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान न्यायालयाने नगर पंचायत प्रशासनाच्या बाजुने निकाल दिला. त्यानंतर मुख्याधिकारी नंदनवार यांनी पुढाकार घेऊन अतिक्रमीत जमिनीवरील तब्बल ४० व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले. येथील विक्रेत्यांना आता जुन्या बाजारपेठेत दुकाने देण्यात येणार आहे. त्यासाठी गाळे व ओट्यांची व्यवस्था करण्यात आली असून हातपंपही बसविणार असल्याचे मुख्याधिकारी नंदनवार यांनी सांगितले. प्रशासकांच्या कार्यकाळात नगर पंचायतीच्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करण्यात आलेले आहे. अशा लोकांवर सुध्दा कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी यावेळी म्हणाले.
अंतर्गत रस्त्याची दुरवस्था बघता येणाऱ्या काळात शहरातील सर्वंच अंतर्गत रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष राजू पेदापल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर अतिक्रमण कारवाई दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी महसूल विभागातर्फे तहसीलदार अशोक कुमरे, मंडळ अधिकारी मंडावार, लिपीक पुप्पालवार, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भरत नंदनवार, नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, नगरसेवक शेख, सतीश भोगे, पोलीस उपनिरिक्षक दाभाडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Encroachment deleted at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.