अतिक्रमित झोपड्या जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:22 AM2018-06-06T01:22:40+5:302018-06-06T01:22:47+5:30

चामोर्शी मार्गावरील कैकाडी वस्तीनजीक असलेल्या बोडीच्या जागेत २२३ नागरिकांनी अतिक्रमण करून काही नागरिकांनी कच्च्या स्वरूपातील झोपड्या उभारल्या होत्या. यातील जवळास १० झोपड्यांना मोगरे नामक शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लावली.

 The encroachment huts were burnt | अतिक्रमित झोपड्या जाळल्या

अतिक्रमित झोपड्या जाळल्या

googlenewsNext
ठळक मुद्देकाही काळ तणाव : कैकाडी वस्तीजवळ २२३ नागरिकांचे अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील कैकाडी वस्तीनजीक असलेल्या बोडीच्या जागेत २२३ नागरिकांनी अतिक्रमण करून काही नागरिकांनी कच्च्या स्वरूपातील झोपड्या उभारल्या होत्या. यातील जवळास १० झोपड्यांना मोगरे नामक शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लावली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कैकाडी वस्तीनजीक काही शेतकºयांची जमीन आहे. या जमिनीच्या वरच्या भागात बोडी आहे. जमीन पडीक आहे. सदर जमीन व बोडी सुध्दा मोगरे यांच्या मालकीची असल्याचे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर सदर जमीन महसूल विभागाचे आहे, अशी माहिती अतिक्रमणधारकांनी दिली. बोडीच्या जवळपास तीन एकर जागेत अतिक्रमणधारकांनी झुडूपे तोडून झोपड्या उभारण्यास सुरूवात केली. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बांधण्यात आलेल्या काही झोपड्या पाडल्या. तर जवळपास १० झोपड्यांना आग लावून पेटवून दिले. एक ते दोन झोपड्या वगळता इतर झोपड्यांमध्ये कोणतेही साहित्य नव्हते. त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. मात्र झोपड्या पाडल्याबाबत अतिक्रमणधारक संतप्त झाले.
याबाबतची माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर सर्व अतिक्रमणधारकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलविण्यात आले. काही काळ थांबल्यानंतर सर्वच अतिक्रमणधारक पुन्हा अतिक्रमीत जागेवर पोहोचले. यानंतर झोपड्या पाडण्याचा प्रयत्न झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. सदर जमीन महसूल विभागाची असल्याने महसूल विभाग योग्य ती कारवाई करेल, अशी माहिती लोकमतला दिली.

Web Title:  The encroachment huts were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.