पांदण रस्त्यांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:26+5:302021-09-02T05:18:26+5:30

कार्यालयांमध्ये वाढला दस्तऐवजांचा पसारा गडचिरोली : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाइलींची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदेसह अनेक कार्यालयांमध्ये या ...

Encroachment on paved roads | पांदण रस्त्यांवर अतिक्रमण

पांदण रस्त्यांवर अतिक्रमण

Next

कार्यालयांमध्ये वाढला दस्तऐवजांचा पसारा

गडचिरोली : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाइलींची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदेसह अनेक कार्यालयांमध्ये या फाईल ठेवण्यासाठी जागा नाही. मागे फाइलचा गठ्ठा व समोर कर्मचारी खुर्ची लावून बसले आहेत. दस्तऐवजांच्या जतनासाठी स्वतंत्र खोलीची गरज आहे. स्वच्छता व सुटसुटीतपणा आवश्यक आहे.

वजनकाटे तपासणीकडे दुर्लक्ष

गडचिरोली : रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र या बाजारात अनेक विक्रेत्यांकडे असलेल्या वजनकाट्यांमध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून येते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवडी बाजारात वजन काटे तपासणीची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सुरू करा

गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. लिफ्टची व्यवस्था केल्यानंतर केवळ दोन ते तीन दिवस ती सुरू होती. त्यानंतर ती बंद करण्यात आली. ही लिफ्ट लवकर सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

मोहफुलांच्या दारूची विक्री जोरात

गडचिरोली : चंद्रपूरची दारूबंदी उठल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातून होणारा दारूचा पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या जंगलात विविध भागांत मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोहफुलांची दारू काढून ती गावागावांत पोहोचविली जात आहे.

बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्या

कुरखेडा : बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रांवर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र या योजनेंतर्गत कर्ज देण्यास बँका चालढकल करतात, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्या

आरमोरी : आरमोरी-गडचिरोली मार्गावरील देऊळगाव हे मोठे गाव आहे. देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

चारचाकी वाहनबंदीकडे दुर्लक्ष

गडचिरोली : शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरातील त्रिमूर्ती चौकात बाजारपेठ असल्याने येथे चारचाकी व दुचाकी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या परिसरातून एकतर्फी वाहतूक केल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

चामोर्शी मार्गावर प्रवासी निवारा द्या

गडचिरोली : चामोर्शी मार्गावर थांबा देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी प्रवासी निवारा नसल्याने प्रवासी भर उन्हात बसची प्रतीक्षा करीत असतात. सदर बसथांब्यावरून अनेक प्रवासी चामोर्शी, अहेरीकडे ये-जा करतात. त्यामुळे गडचिरोली आगाराने चामोर्शी मार्गावर प्रवाशांसाठी शेड उभारावी, अशी मागणी होत आहे. निवाऱ्याअभावी येथे प्रवाशांना उभे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे येथे बसथांबा द्यावा, अशी मागणी हाेत आहे.

भिकारमाैशी मार्गाची दुरवस्था कायम

गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमाैशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गावरून महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या होत आहेत. शालेय विद्यार्थी व नागरिक येथून ये-जा करीत असतात.

Web Title: Encroachment on paved roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.