संरक्षित वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:18 PM2017-11-20T22:18:48+5:302017-11-20T22:20:12+5:30

देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते.

The encroachment on protected forest land was deleted | संरक्षित वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

संरक्षित वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

Next
ठळक मुद्देशेतात जेसीबी चालविली : बोळधा येथे वन विभागाची कारवाई

आॅनलाईन लोकमत
कोरेगाव/चोप : देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते. संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावूनही अतिक्रमण कायमच राहिले. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने संबंधित अतिक्रमीत जागेवरील अतिक्रमण हटविले. सदर कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास वडसा वन विभागचे सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे व वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार यांनी पोलीस बंदोबस्तात पार पाडली.
बोळधा येथील सर्वे नंबर ४५६/१ मधील ३३.८२ हेक्टरपैकी १.७९१ हेक्टर इतक्या संरक्षित वन जमिनीवर बोळधा येथील रतीराम भिवा गायकवाड, मुरलीधर धर्मा मेश्राम, पुंडलिक तिमा गायकवाड, विश्वनाथ तुकाराम गायकवाड व गोपाल विनायक सुकारे या पाच शेतकºयांनी अतिक्रमण घेऊन पीक घेणे सुरू केले होते. शासन निर्णयानुसार पाचही शेतकºयांनी शेती कसणे सुरू केले. दरम्यान वन विभागांनी या शेतकºयांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजाविली. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने वनाधिकाºयांनी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने या संरक्षित वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले. या कारवाईमुळे जंगलात अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
संरक्षित वन जमिनीवर अतिक्रमण झाले असल्याच्या मुद्यावर वनाधिकाºयांनी ठोस भूमिका घेतली. त्यानंतर पुढाकार घेऊन संरक्षित वनाची जागा आपल्या ताब्यात घेतली व त्यानंतर या ठिकाणी नाली खोदण्यात आली.
जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई सहायक वनसंरक्षक बी. व्ही. कांबळे, वन परिक्षेत्राधिकारी एन. जी. चांदेवार, जांभुळे, क्षेत्र सहायक मेनेवार, माडावार, ठाकरे, कोसमसिले, वनपाल वंजारी, कुंभरे यांच्यासह वनरक्षक, वनमजूर आदींनी केली. सदर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान देसाईगंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. बहुप्रतिक्षेनंतर अतिक्रमण काढण्यात आले.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी यापूर्वी आंदोलन
बोळधा हे गाव देसाईगंज तालुक्यात वन जमीन अतिक्रमणाच्या जास्तीत जास्त भागाने व्यापला आहे. पाच वर्षांपूर्वी या अतिक्रमणधारकांच्या वाढत्या हिंमतीमुळे येथे मृतदेह पुरण्यासाठी जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे चक्क ग्रामपंचायत कार्यालयात मृतदेह नेऊन मशानभूमीची जागा मोकळी करा, नाही तर मृतदेह गावात पुरण्यासाठी परवानगी द्या, या मागणीकरिता आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर तत्कालीन पोलीस निरिक्षक दीपक निकम यांनी तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी यांना पाचारण करून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई त्यावेळी केली होती.

Web Title: The encroachment on protected forest land was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.