पालिका प्रशासनाने काढले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:24 AM2018-05-24T00:24:52+5:302018-05-24T00:24:52+5:30

गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत आरमोरी मार्गाच्या मागील परिसरातील चिचाडा तलाव आहे. पावसाळ्यात या तलावातील ओव्हरफ्लोचे पाणी बाहेर निघावे, यासाठी न.प. ने वेस्टवेअर तयार केला होता. मात्र या भागात वास्तव्य करीत असलेल्या तीन नागरिकांनी अतिक्रमण करून वेस्टवेअरच्या तोंडावर मातीचा थर टाकून पाण्याचा मार्ग बंद केला.

Encroachment removed by municipal administration | पालिका प्रशासनाने काढले अतिक्रमण

पालिका प्रशासनाने काढले अतिक्रमण

Next
ठळक मुद्देनोटीस बजावूनही प्रतिसाद नाही : मातीचा थर काढून चिचाळा तलावाचे वेस्टवेअर केले मोकळे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत आरमोरी मार्गाच्या मागील परिसरातील चिचाडा तलाव आहे. पावसाळ्यात या तलावातील ओव्हरफ्लोचे पाणी बाहेर निघावे, यासाठी न.प. ने वेस्टवेअर तयार केला होता. मात्र या भागात वास्तव्य करीत असलेल्या तीन नागरिकांनी अतिक्रमण करून वेस्टवेअरच्या तोंडावर मातीचा थर टाकून पाण्याचा मार्ग बंद केला. नोटीस बजावून अतिक्रमणधारकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी थेट वेस्टवेअरच्या ठिकाणी जाऊन मातीचा थर काढला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचा मार्ग मोकळा केला.
अतिक्रमण काढून वेस्टवेअर मोकळा केल्याने आता पावसाळ्यात या तलावातील ओव्हरफ्लोचे पाणी वेस्टवेअरमधून योग्यरित्या बाहेर पडण्यास मदत होणार आहे. वेस्टवेअर मोकळा केला नसता तर चिचाळा तलावातील पाणी लगतच्या घरात शिरले असते. तसेच तलावाची पाळही फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी याबाबीची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वीच चिचाळा तलावाचा वेस्टवेअर मोकळा केला.
कारवाईच्या वेळी पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, बांधकाम विभागाचे नगररचनाकार मैंद, ताकसांडे, भरडकर, नितेश सोनवने यांच्यासह पालिकेचे अन्य कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान पालिकेच्या कर्मचाºयांनी सोबत जेसीबी, ट्रॅक्टर व इतर साहित्य आणले होते.
पालिकेने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण करून चिचाडा तलावाचा वेस्टवेअरमधील पाणी जाण्याचा मार्ग बंद केला होता. त्यामुळे पालिकेने संबंधित तीन अतिक्रमणधारक नागरिकांना नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांनी अतिक्रमणधारकांना तोंडी सूचना दिली. पावसाळ्यात धोका होण्याची शक्यता असल्याने वेस्टवेअरच्या मार्गावर टाकलेला मातीचा थर तत्काळ काढून घ्यावा, पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग मोकळा करावा, असे नोटीसमध्ये नमूद होते. मात्र अतिक्रमणधारक नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या नोटीसचे उत्तर दिले नाही. त्यामुळे अखेर मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी पुढाकार घेऊन चिचाडा तलाव वेस्टवेअरवरील अतिक्रमण काढले. पाण्याचा मार्ग मोकळा केला.
३०० मीटर लांबीचा रस्ता तयार
पालिका प्रशासनाच्या वतीने चिचाळा तलावाच्या वेस्टवेअरवरील नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटविले. येथील मातीचा थर काढून पाण्याचा मार्ग मोकळा केला. सदर ठिकाणची माती ट्रॅक्टरने आरमोरी मार्गावरील संस्कृती लॉनच्या दुसºया गल्लीत टाकून येथे ३०० मीटर लांबीचा कच्चा रस्ता तयार केला. त्यामुळे संस्कृती लॉनच्या परिसरातील ले-आऊटमध्ये वास्तव्याने असलेल्या नागरिकांना रस्त्याची व्यवस्था झाली आहे. यापूर्वी दरवर्षीच्या पावसाळ्यात सदर गल्लीमध्ये पाणी साचून चिखल निर्माण होत होता. मात्र आता येथे माती टाकून कच्चा रस्ता तयार केल्याने ही समस्या काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी न.प. प्रशासनाप्रती समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Encroachment removed by municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.