अखेर सिराेंचा तालुकावासीय आणि आंदोलकांपुढे झुकले तेलंगणा प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:00 AM2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:29+5:30

कोरोनाकाळापासून बंद असलेले गेट नागरिकांच्या रहदारीसाठी उघडे करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान ३१ डिसेंबरपर्यंत गेट उघडण्यासह इतर आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप पोरेत व इतर आंदोलकांनी दिला.लक्ष्मी डॅमवरील रहदारीसाठी ठेवलेले गेट कोरोनाकाळापासून तेलंगणा प्रशासनाने बंद केले. ते अजूनही उघडले नसल्यामुळे नागरिकांना तेलंगणात जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणी जात आहेत.

In the end, the Telangana administration bowed before the taluka residents and protesters | अखेर सिराेंचा तालुकावासीय आणि आंदोलकांपुढे झुकले तेलंगणा प्रशासन

अखेर सिराेंचा तालुकावासीय आणि आंदोलकांपुढे झुकले तेलंगणा प्रशासन

Next
ठळक मुद्देमेडिगड्डाचे गेट उघडण्यासह इतर मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

  लाेकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : मेडिगड्डा बॅरेजमुळे निर्माण झालेल्या विविध समस्या दूर करण्यासाठी मेडिगड्डा प्रकल्पाच्या गेटसमोर शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनासमोर अखेर तेलंगणा सरकारच्या संबंधित जिल्हा प्रशासनाने नांगी टाकली. 
कोरोनाकाळापासून बंद असलेले गेट नागरिकांच्या रहदारीसाठी उघडे करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान ३१ डिसेंबरपर्यंत गेट उघडण्यासह इतर आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप पोरेत व इतर आंदोलकांनी दिला.लक्ष्मी डॅमवरील रहदारीसाठी ठेवलेले गेट कोरोनाकाळापासून तेलंगणा प्रशासनाने बंद केले. ते अजूनही उघडले नसल्यामुळे नागरिकांना तेलंगणात जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणी जात आहेत. बॅरेजमध्ये पाणी अडविल्याने बॅक वॉटर वाढून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही ती लवकर द्यावी, बॅरेजचे पाणी सोडल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली ते सोमनूरपर्यंत नदीकाठची जमीन खरडून आतापर्यंत १०० हेक्टरच्या वर जमीन पाण्यात वाहून गेली. त्याचे सर्वेक्षण करून ठरल्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी दि.१६ ला सकाळी ११ वाजतापासून मेडिगड्डाच्या गेटसमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. दिवसभरात दोन वेळा तेलंगणा प्रशासनाशी चर्चा फिस्कटली. रात्री १० वाजताच्यादरम्यान महादेवपूरचे तहसीलदार यांनी  सरसकट सर्व मागण्या ३१ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. ३१ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 
यावेडी संदीप पोरेत यांच्यासह अमित बेझलवार, चंद्रशेखर पुलगम, सांबाजी सोमनपल्ली,  देवेंद्र रंगू भास्कर गुडीमेटला, लंगारी कलाक्षपवर, अनिकेत ओंडरे,  समय्या ओलाला, रमेश गट्टू, नर्सिंग सिल्व्हेरी, संपत अण्णा यांच्यासह अंकीसा व आसरअल्ली येथील नागरिक उपस्थित होते.

बंद पाळून नागरिकांनी दिला पाठींबा
आंदोलनदरम्यान अंकीसा व आसरली येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दर्शवला. तसेच काळी-पिवळी वाहन संघटना, ऑटो चालक-मालक संघटना यांनीही आपल्या गाड्या बंद ठेवून या आंदोलनात ते सहभागी झाले होते.

दुर्लक्ष केल्यामुळे उपसले आंदोलनाचे हत्यार
सदर ठिय्या आंदोलनापूर्वी तहसीलदारांमार्फत गडचिरोलीत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर खासदार अशोक नेते यांच्या समक्ष जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या विषयाचे गांभीर्य समजावून सांगितल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणा राज्यातील जयशंकर भोपालपल्ली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. मात्र तेलंगाणा प्रशासनाने या गंभीर  विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 

 

Web Title: In the end, the Telangana administration bowed before the taluka residents and protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.