योग्य नियोजनाने अंमलबजावणी करा

By Admin | Published: June 22, 2017 01:36 AM2017-06-22T01:36:29+5:302017-06-22T01:36:29+5:30

कुरुड केंद्रांतर्गत जि. प. व खाजगी शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळा सिध्दी कार्यक्रमातील

Enforce proper planning | योग्य नियोजनाने अंमलबजावणी करा

योग्य नियोजनाने अंमलबजावणी करा

googlenewsNext

गटशिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : कुरूड येथे शिक्षकांची सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : कुरुड केंद्रांतर्गत जि. प. व खाजगी शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळा सिध्दी कार्यक्रमातील प्रमुख क्षेत्रे व गाभा मानके यांचा अभ्यास करुन नियोजन करावे व त्यानुसार अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर यांनी केले.
कुरुड केंद्रातील शिक्षकांच्या सभेत ‘शाळा व शैक्षणिक नियोजन’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. केंद्रप्रमुख विजय बन्सोड यांनी शाळा सिध्दी कार्यक्रमातील प्रमुख सात क्षेत्रे व छेचाळीस गाभा मानके याबाबत माहिती दिली. सामाजिक न्याय दिन, प्रवेशोत्सव, शाळाबाह्य मुले, गणवेश आदी विषयावर माहिती देण्यात आली. सभेदरम्यान कुरूड केंद्रात नव्याने रुजू झालेले गजानन शेंद्रे, भाष्कर मेश्राम व पुरुषोत्तम देशकर यांचा पुष्पगच्ुछाने स्वागत करण्यात आला. सभेला जि. प. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री पराते, कोंढाळाचे मुख्याध्यापक अनिल मुलकलवार, प्रभु गोमासे, खाजगी शाळेचे मुख्याध्यापक मधुकर राऊत, देवेंद्र नाकाडे, उल्हास अंबोरे, ओमप्रकाश लेनगुरे, सुरेश रेवतकर,श्रीकृष्ण भागडकर व विजय तुपटे तसेच शिक्षक , शिक्षिका उपस्थित होत्या.

Web Title: Enforce proper planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.